BCCI, PCB चा वाद! आशिया चषकात तुम्ही नाही आले तर, विश्वचषकासाठी आम्ही नाही येणार

या सर्व प्रकरणावर आता केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
BCCI, PCB
BCCI, PCBDainik Gomantak

पाकिस्तानमध्ये 2023 मध्ये पुढचा आशिया चषक (Asia Cup) होणार आहे. यावरून बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी आशिया चषकाच्या ठिकाणावरून वक्तव्य केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) याबाबत आक्रमक भूमिका घेत, भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी आला नाही तर पीसीबी 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संघ पाठवणार नाही, असे पीसीबीने म्हटले आहे. या सर्व प्रकरणावर आता केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BCCI, PCB
BCCIच्या वरिष्ठ निवड समितीमध्ये होऊ शकतो मोठा बदल, पाहायला मिळू शकतात तीन नवे चेहरे

'बीसीसीआयकडे हा विषय आहे आणि ते यावर भाष्य करतील. भारत क्रीडा क्षेत्रातील महासत्ता आहे, भारतात अनेक विश्वचषकांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषकही भारतात होणार असून जगभरातील सर्व मोठे संघ त्यात सहभागी होतील.' असे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर अनुराग ठाकूर म्हणाले.

'कोणत्याही खेळाबाबत तुम्ही भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही. भारताने खेळांमध्ये, विशेषतः क्रिकेटमध्ये खूप योगदान दिले आहे. भारतात पुढील वर्षी विश्वचषकाचे आयोजन केले असून, हा भव्य आणि ऐतिहासिक सोहळा असेल.' असे अनुराग ठाकूर म्हणाले.

BCCI, PCB
IND Vs PAK: हिट मॅनचा पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त प्लॅन, सामन्यापूर्वी केला खुलासा

दरम्यान, जय शहा (Jay Shah) यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान क्रिेकेट मंडळ चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांनी थेट टोकाची भूमिका घेत विश्वचषकात संघ न पाठविण्याची एकप्रकारे धमकीच दिली आहे. तसेच, मंडळाने जय शहा यांनी असे वक्तव्य करताना संभाळून करावे असे म्हटले आहे. त्यांच्या अशा वक्यव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा संदेश जातो असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com