Women's IPL: महिला आयपीएलही मालामाल! 5 वर्षांच्या मीडिया राईट्ससाठी BCCI ला मिळणार तब्बल 'इतके' कोटी

महिला आयपीएलसाठी मीडिया हक्क विकले गेले असून यातून बीसीसीआयला कोट्यावधी रुपये मिळणार आहेत.
Women's IPL
Women's IPLDainik Gomantak

Women's IPL: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यावर्षी महिला इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी बीसीसीआयने तयारीही सुरू केली आहे. सोमवारी बीसीसीआयने मीडिया हक्काबद्दलची मोठी घोषणा केली आहे.

बीसीसीआयने जाहीर केल्याप्रमाणे 2023 ते 2027 या पाच वर्षांसाठी महिला आयपीएलचे मीडिया हक्क व्हियाकॉम 18 मीडिया प्रायवेट लिमिटेडने जिंकले आहेत. बीसीसीआयने काहीदिवसांपूर्वी महिला आयपीएल 2023 चे 2027 हंगांमांच्या मीडिया हक्कासाठी निविदा मागवल्या होत्या.

दरम्यान, या सर्व प्रक्रियेनंतर आता बीसीसीआयने व्हियाकॉम 18 कंपनीने मीडिया हक्क विकत घेतल्याची माहिती दिली. हे मीडिया हक्क दूरदर्शन आणि डिजिटल असे दोन्ही माध्यमांसाठी आहेत.

(BCCI announces Media Rights for the Women’s IPL Seasons 2023-2027)

Women's IPL
New Chief Selector: BCCI चा मोठा निर्णय, चेतन शर्मा यांची पुन्हा मुख्य सिलेक्टर्स पदी निवड

व्हियाकॉम 18 कंपनीने 951 कोटी रुपयांची बोली लावून हे मीडिया हक्क जिंकले आहेत. या बोलीनुसार प्रत्येक सामन्यासाठी कंपनी बीसीसीआयला 7.09 रुपये देईल. या मीडिया हक्काच्या लिलावाच्या प्रक्रियेत अर्गस पार्टनर्स बीसीसीआयचे कायदेशीर सल्लागार होते.

वायकॉम 18 कंपनीने मीडिया हक्क खरेदी केल्याबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देखील ट्वीट केले होते. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की 'वायकॉम 18 चे महिला आयपीएलचे मीडिया हक्क जिंकल्याबद्दल अभिनंदन. बीसीसीआयवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद. वायकॉमने 5 वर्षांसाठी 951 कोटी रुपयांना हक्क खरेदी केले असून प्रत्येक सामन्याची किंमत 7.09 कोटी असेल. हा महिला क्रिकेटमध्ये मोठा टप्पा आहे.'

तसेच त्यांनी पुढे लिहिले की 'समान वेतनानंतर आता महिला आयपीएलच्या मीडिया हक्काने आज एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. भारतात महिला क्रिकेटच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाचे आणि मोठा पाऊल आहे. यामुळे सर्व वयोगटातील महिला क्रिकेटमध्ये सहभाग वाढेल. खरोखरच ही एक नवी पाहाट आहे.'

Women's IPL
BCCI Meeting: यो-यो टेस्ट ते संघनिवडीचे निकष, बीसीसीआयचे रिव्ह्यू मिटिंगमध्ये मोठे निर्णय

याशिवाय भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मिताली राज यांनी देखील या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनीही वायकॉम 18 कंपनीचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, आता मीडिया हक्कानंतर 25 जानेवारी रोजी महिला आयपीएलमधील ५ संघांची घोषणा देखील करण्यात येणार आहे. यासाठी पुरुष आयपीएलमधील 8 संघ शर्यतीत असल्याची चर्चा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com