Goa Sports: रणजी स्पर्धेत गोव्यासाठी कठीण गट

एलिट ड गटात खेळणार; सर्व साखळी सामने अहमदाबादेत
Goa Sports: रणजी स्पर्धेत गोव्यासाठी कठीण गट
Goa CricketDainik Gomantak

पणजी: आगामी मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत (Ranji Trophy cricket tournament) गोव्याचा (Goa) कठीण गटात समावेश आहे. एलिट ड गटात त्यांच्यासह गतविजेते सौराष्ट्र, माजी विजेते तमिळनाडू व रेल्वे, तसेच झारखंड, जम्मू-काश्मीर या मातब्बर संघ आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेची गटवारी व वेळापत्रक जाहीर केले. कोरोना विषाणू महामारीमुळे प्रत्येक गटातील सामने एकाच केंद्रावर जैवसुरक्षा वातावरणात खेळले जातील. गोव्याच्या एलिट ड गटातील सर्व साखळी सामने अहमदाबाद येथे होतील. गट साखळीतील सामने पुढील वर्षी 13 जानेवारी 13 फेब्रुवारी या कालावधीत होतील.

Goa Cricket
Goa Sports: एफसी गोवा संघात ऑस्ट्रेलियन बचावपटू

विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत गोव्याचा एलिट ई गटात समावेश असून पंजाब, रेल्वे, राजस्थान, सेनादल, आसाम हे संघ प्रतिस्पर्धी आहेत. या स्पर्धेतील सामने 8 ते 14 डिसेंबर या कालावधीत होतील.

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत लखनौ येथे गोवा एलिट अ गटात खेळेल. या गटात पंजाब, तमिळनाडू, ओडिशा, महाराष्ट्र व पुदुचेरी हे अन्य संघ आहेत. गट साखळी सामने 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत खेळले जातील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com