BCCI ने दक्षिण आफ्रिका अन् ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेची केली घोषणा

Team India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) बुधवारी आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.
Team India
Team IndiaDainik Gomantak

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) बुधवारी आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. भारताचा आंतरराष्ट्रीय देशांतर्गत हंगाम सप्टेंबर 2022-23 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेने सुरु होईल, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या T20 आणि समान संख्येने एकदिवसीय मालिका होईल.

दरम्यान, मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा (Australia) पहिला T20 सामना आणि त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहे. कांगारु संघाविरुद्धचा पहिला T20 सामना 20 सप्टेंबरला, दुसरा सामना 23 सप्टेंबरला आणि तिसरा सामना 25 सप्टेंबरला होणार आहे.

Team India
Team India: भारताचा हा दिग्गज खेळाडू T20 क्रिकेटमधून घेणार निवृत्ती!

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) देशातर्गंत टी-20 मालिकेला तिरुअनंतपुरममध्ये सुरुवात होणार आहे. दुसरा T20 सामना 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त गुवाहाटी येथे खेळवला जाईल, त्यानंतर शेवटचा T20 सामना इंदूर येथे होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 सामना 28 सप्टेंबरला, दुसरा T20 सामना 2 ऑक्टोबरला आणि तिसरा सामना 4 ऑक्टोबरला खेळवला जाईल.

Team India
Team India: मोहम्मद शमी नसता तर...

त्यानंतर वनडे मालिका सुरु होईल. 6 ऑक्टोबरला पहिला एकदिवसीय सामना लखनौमध्ये, तर दुसरा सामना रांचीमध्ये आणि तिसरा एकदिवसीय सामना दिल्लीत खेळवला जाईल. वनडे मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर, दुसरा सामना 9 ऑक्टोबर आणि तिसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर टीम इंडिया (Team India) 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com