Zimbabwe विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, गब्बर करणार नेतृत्व

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India Tour Of Zimbabwe: झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, वरिष्ठ फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत, अष्टपैलू रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाचा भाग नसतील.

वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर परतले

फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि दीपक चहर (Deepak Chahar) यांचे संघात पुनरागमन झाले आहे. दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियामधून (Team India) बाहेर होते. दुखापतीमुळे दीपक आयपीएल 2022 मध्येही सहभागी होऊ शकला नव्हता.

Team India
India Tour of West Indies: वनडे अन् टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये दाखल

राहुल त्रिपाठीला पहिल्यांदाच टीम इंडियाकडून कॉल आला

IPL 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी (Sunrisers Hyderabad) चमकदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीचा भारतीय वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. याआधी त्याला भारताच्या T20 संघात संधी मिळाली आहे. याशिवाय झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात यष्टीरक्षक संजू सॅमसनचाही समावेश करण्यात आला आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ - शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (डब्ल्यूके), संजू सॅमसन (डब्ल्यूके), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव. , अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर.

Team India
टीम इंडिया टी-20 मधून विराट कोहली पडणार बाहेर?

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

टीम इंडिया 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी झिम्बाब्वेमध्ये तीन वनडे खेळणार आहे. हे सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहेत. सहा वर्षांतील भारताचा हा पहिला झिम्बाब्वे दौरा आहे. MS धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने जून-जुलै 2016 मध्ये तीन एकदिवसीय सामने आणि तितकेच T20 सामने खेळले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com