कोरोनाशी दोन हात करण्यासाठी बीसीसीआय पुन्हा मैदानात

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

बीसीसीआय आज ट्विट करत 10 लिटरचे 2000 ऑक्सिजन (Oxygen) संच देणार असल्याचे जाहिर केले आहे. यामुळे भारताला कोरोना विरुद्धच्या लढाईत मदत होईल. हे ऑक्सिजन संच येत्या काही दिवसांत देशात वितरित करण्यात येतील.

भारतात कोरोनाने (Covid - 19) थैमान घातले असून, देशातील रुग्णांची संख्या दररोज लाखोंच्या घरात वाढत आहे. त्यात वैद्यकिय सुविधांचा देखील तुटवडा जाणवत असून वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. अशा परिस्थिती अनेक सेवाभावी संस्था, सेलिब्रेटी (Celebrity), खेळडू आणि दिग्गज मान्यवर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अशातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी मदत देऊ केली आहे. 

बीसीसीआय आज ट्विट करत 10 लिटरचे 2000 ऑक्सिजन (Oxygen) संच देणार असल्याचे जाहिर केले आहे. यामुळे भारताला कोरोना विरुद्धच्या लढाईत मदत होईल. हे ऑक्सिजन संच येत्या काही दिवसांत देशात वितरित करण्यात येतील. असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ यांनी  स्पष्ट केले आहे.

 

ऑलिंपिक पात्र खेळाडूंचे झाले लसीकरण

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही बीसीसीआय कडून मदतीचा हात देण्यात आला होता. त्यावेळी बीसीसीआयने 51 कोटी रुपयांचा मदत केली होती. तसेच परदेशी खेळाडू पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेस् बेऱ्हेंडॉर्फ या परदेशी खेळाडूंसह भारतीय खेळाडूंनी  देखील मदत केलीआहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी राबविलेल्या मोहिमे अंतर्गत 11 कोटींपेक्षा जास्त मदत यांनी केली आहे. या शिवाय यजुवेंद्र चहल, हार्दिक आणि कुणाल पांड्या यांनी 200 ऑक्सिजन संचाची मदत केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia )आणि एस्टोनिया क्रिकेट (Cricket Estonia) बोर्डांनींही भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान दिले आहे.

संबंधित बातम्या