IND vs PAK: पाकला मोठा झटका, टीम इंडिया इतके दिवस कोणतीही मालिका खेळणार नाही!

BCCI On IND-PAK Bilateral Series: भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच चाहत्यांची उत्कंठा वाढवतो.
Pakistan cricket team
Pakistan cricket team Dainik Gomantak

India vs Pakistan Cricket: भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच चाहत्यांची उत्कंठा वाढवतो. मात्र दोन्ही संघ दीर्घकाळ कोणतीही द्विपक्षीय मालिका एकत्रित खेळलेले नाहीत. फक्त आयसीसी किंवा इतर जागतिक स्पर्धेत दोन्ही संघ आमने-सामने येतात. यातच, सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट मालिका होण्याची शक्यता नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (BCCI) याला दुजोरा दिला आहे.

23 ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषकात सामना होणार

भारतीय संघ 23 ऑक्टोबरला आयसीसी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानशी भिडणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) संघातील इतर खेळाडू आधीच ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. पर्थमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया-इलेव्हन विरुद्ध काही सराव सामनेही खेळले गेले आहेत. दुसरीकडे, पाकिस्ताननेही न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध तिरंगी मालिका खेळली आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील संघ आगामी जागतिक स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे.

Pakistan cricket team
IND W Vs PAK W: आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव

2027 पर्यंत कोणतीही द्विपक्षीय मालिका नाही

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट मालिका पुढील पाच वर्षे खेळवली जाणार नाही. याबाबत बीसीसीआयने आपल्या सर्व संबंधितांना अधिकृतपणे माहिती दिली आहे. 2023-2027 च्या FTP (Future Tour Program) सायकलमध्ये भारत पाकिस्तानसोबत कोणत्याही फॉरमॅटमध्ये द्विपक्षीय मालिका खेळणार नाही.

Pakistan cricket team
Women’s T20 Asia Cup चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला भिडणार IND vs PAK

सर्व राज्य संघटनांना नोट पाठवली

बीसीसीआयने त्यांच्या सर्व राज्य संघटनांना पुढील चार वर्षांच्या FTP सायकलसाठी एक नोट पाठवली आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, भारत सरकारची परवानगी मिळेपर्यंत बीसीसीआय पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांसाठी बोर्डाने 'कोरा' कॉलम ठेवला आहे. आगामी FTP च्या सायकलमध्ये भारतीय पुरुष संघ 38 कसोटी सामने (20 मायदेशात आणि 18 परदेशात) खेळेल तर 42 एकदिवसीय सामने (21 मायदेशात आणि 21 परदेशात) खेळले जातील. याशिवाय 61 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील त्यापैकी 31 भारतीय भूमीवर होतील. दरवर्षी एक ICC स्पर्धा आणि IPL मुळे, सर्व फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणार्‍या सामन्यांची संख्या मागील सायकलपासून (163 ते 141) कमी करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com