BCCI धोनीला देऊ शकते 'डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ ची मोठी जबाबदारी !

BCCI: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर बीसीसीआय मोठी जबाबदारी देऊ शकते.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak

टि-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर आणि मोठ्या स्पर्धांमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. या तयारी दरम्यान बीसीसीआय (BCCI) भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) मोठी जबाबदारी सोपवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय T20 क्रिकेटच्या सेटअपसह मोठ्या भूमिकेसाठी BCCI धोनीला SOS पाठवण्यास तयार आहे. बीसीसीआय भारतीय क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी भूमिकेसाठी धोनीला बोलावण्याचा विचार करत आहे.

धोनीला मिळू शकते मोठी जबाबदारी
'द टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोलला असे वाटते की टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये व्यवस्थापनाचे काम थोडे जड आहे. हे पाहता बीसीसीआय प्रशिक्षकांच्या भूमिकेच्या वाटपाचा विचार करत आहे. हे पाहता बीसीसीआय धोनीचा समावेश करून टीम इंडियाची (Team India) पातळी उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे. वृत्तानुसार, या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.

MS Dhoni
National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आयपीएल 2023 च्या खेळातून निवृत्त होऊ शकतो, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यानंतर बीसीसीआय (BCCI) त्याला त्याचा अनुभव आणि तंत्राचा योग्य वापर करण्याची मोठी जबाबदारी देऊ शकते. भारताला दोन वेळा वर्ल्ड कप चॅम्पियन बनवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला विशेषत: टीम इंडियासोबत टी-20 संघ चालवण्यास सांगितले जाऊ शकते. 

धोनीला कधी आणि कोणत्या फॉरमॅटची जबाबदारी दिली जाईल याबाबत बीसीसीआयकडून मात्र अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत धोनीच्या भूमिकेवर चर्चा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com