INDvsENG : आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर; हे खेळाडू परतणार

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाहुण्या इंग्लंड संघाचा पराभव केला. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. आणि त्यानंतर आता उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या नवीन सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाहुण्या इंग्लंड संघाचा पराभव केला. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. आणि त्यानंतर आता उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या नवीन सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. यातील तिसरा कसोटी सामना हा डे नाईट होणार आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पहिल्यांदाच पिंक बॉल मध्ये डे नाईटचा थरार रंगणार आहे. आणि या उर्वरित दोन्ही सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाच्या निवड समितीने टीम इंडियाची आज घोषणा केली आहे. 

ICC Test Rankings : हिटमॅनची मोठी झेप; तर ऑल राउंडर यादीत अश्विन पहिल्या...

बीसीसीआयच्या चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या उर्वरित दोन सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर मयांक अग्रवाल, केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि वृद्धिमान साहा यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच आगामी दोन सामन्यांसाठी उमेश यादव संघात सामील होणार आहे. दुखापतीतून सावरलेल्या उमेश यादवची अहमदाबाद मध्ये तंदरुस्ती चाचणी घेण्यात येणार असून, त्यानंतर तो शार्दूल ठाकूरची जागा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करत पाहुण्या इंग्लंड संघाला हरवले होते. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने इंग्लंडसोबत 1 - 1 अशी बरोबरी साधली आहे. आणि यावर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आगामी दोन्ही सामने महत्वपूर्ण राहणार आहेत.  

इंग्लंडसोबत होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी फुल फॉर्म मध्ये असलेल्या केएल राहुलचा संघात समावेश झाल्यामुळे भारतीय संघ अजून ताकतवर होणार आहे. याशिवाय, हार्दिक पांड्या देखील मैदानात उतरणार आहे. इतकेच नाही तर, वृद्धिमान साहा आणि मयांक अग्रवालचे देखील पुनरागमन झाले असल्यामुळे भारतीय संघाकडे अनेक ऑप्शन उपलब्ध राहणार आहेत.           

इंग्लंड विरुद्धच्या आगामी दोन सामन्यांसाठीचा भारतीय संघ - 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या