कसोटी सामने कमी करण्याबाबत अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही विनंती नाही : ईसीबीचे स्पष्टीकरण

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 21 मे 2021

आयपीएलचे यंदाच्या मोसमातील 31 सामने इंग्लंडमध्ये होणार आसल्याची चर्चा होतीच, त्यासाठी बीसीसीआयने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणारे पाच कसोटी सामन्यांच्या कार्यक्रमात ईसीबीने बदल करावा आणि हा कार्यक्रम लवकर संपवावा अशी विनंती बीसीसीआयने केल्याचे वृत्त इंग्लिश माध्यमांनीच दिले होते.

नवी दिल्ली : आयपीएलचा (IPL) उर्वरित हंगाम पूर्ण करण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) कसोटी मालिकेत बदल करावा, अशी कोणत्याही प्रकारची विनंती भारतीय क्रिकेट बोर्डाकडून (BCCI) आम्हाला करण्यात आलेली नाही किंवा याबाबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. असा खुलासा इंग्लंड बोर्डाकडून करण्यात आला आहे. 

आयपीएलचे यंदाच्या मोसमातील 31 सामने इंग्लंडमध्ये होणार आसल्याची चर्चा होतीच, त्यासाठी बीसीसीआयने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणारे पाच कसोटी सामन्यांच्या कार्यक्रमात ईसीबीने बदल करावा आणि हा कार्यक्रम लवकर संपवावा अशी विनंती बीसीसीआयने केल्याचे वृत्त इंग्लिश माध्यमांनीच दिले होते. या मालिकेतील आखेरचा सामना मँचेस्टर (Manchester)  येथे 10 सप्टेंबरला खेळविण्यात येणार आहे. 

आपीएलच्या उर्वरीत हंगामासाठी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला कात्री ?

कोरोनाच्या संकटामुळे उपस्थित होणाऱ्या अडचणी आम्ही समजू शकतो. परंतु हा विषय चर्चेचा आहे. याबाबत आम्ही बीसीसीआयशी संपर्कात आहोत, पण त्यांच्याकडून ही मालिका लवकर संपवावी अशी कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही पाच कसोटी सामन्यांची मालिका ठरल्याप्रमाणेच होणार आसल्याचे ईसीबीकडून सांगण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या