BCCI: भारतीय महिला क्रिकेटपटूंचे ऑस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षण सुरू

भारतीय महिला क्रिकेटपटू 3 एकदिवसीय, 1 कसोटी व 3 T20 सामने खेळणार
BCCI: भारतीय महिला क्रिकेटपटूंचे ऑस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षण सुरू
BCCI: Women Cricketers at Coaching SessionDainik Gomanatk

BCCI: भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women Cricket Team) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला (Aus Vs Ind, Women Cricket 2021) पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या तीनही फॉरमॅट (Cricket in All 3 Formats) मधील क्रिकेट मालिकांच्या दृष्टीने प्रशिक्षण सत्र सुरू केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याविषयीचा महिला संघाचा सराव करतानाचा फोटो पोस्ट केला. फोटो पोस्ट करताना भारतीय क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे कि, "मालिका पार्श्वभूमीवर प्रशिक्षण सुरु झाले."

BCCI: Women Cricketers at Coaching Session
ICC Women ODI Rankings: मिताली राज वनडे क्रमवारीत अव्वलच, पहा टॉप 10

भारतीय महिला संघ 21, 24 आणि 26 सप्टेंबर रोजी हारूप पार्क, मके येथे तीन एकदिवसीय सामने खेळेल. एकदिवसीय मालिकेनंतर लगेच 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल येथे एकमेव कसोटी सामना खेळेल. तसेच दौऱ्याच्या शेवटी भारतीय महिला संघ 7, 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी तीन T20 सामने खेळेल.

भारतीय महिला क्रिकेट संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरून परतला आहे. दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी ही अनिर्णित राहिली होती तर इंग्लंडने एकदिवसीय आणि टी -20 मालिका 2-1 ने खिशात टाकली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com