Substitution Rule in Cricket: फुटबॉलप्रमाणे क्रिकेटमध्ये दिसणार सब्स्टिट्यूट

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ऑक्टोबरमध्ये सुरू होत आहे.
Substitution Rule in Cricket
Substitution Rule in CricketDainik Gomantak

फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल आणि बेसबॉल या खेळांमध्ये तुम्ही अनेकदा पर्यायी खेळाडूंना खेळताना पाहिले असेल. संघ मैदानात उपस्थित असलेल्या त्यांच्या खेळाडूंपैकी एकाला बेंचवर ठेवतात आणि त्याच्या जागी दुसरा खेळाडू घेतात. सामन्याच्या रणनीती आणि परिस्थितीनुसार संघ हे करतात. क्रिकेटमध्येही (Cricket) ते लवकरच पाहायला मिळणार आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसणार नसला तरी केवळ भारतातील देशांतर्गत स्पर्धेदरम्यान दिसणार आहे.

बीसीसीआय (BCCI) ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्ये संघांना पर्याय निवडण्याची संधी देणार आहे. या नियमाला 'इम्पॅक्ट प्लेयर' असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत, संघ त्यांच्यापैकी एक खेळाडूला पर्याय म्हणून रणनीतिकदृष्ट्या मैदानात उतरवू शकतील. 

हा नियम 2005 मध्ये प्रथमच क्रिकेटमध्ये लागू करण्यात आला होता
ICC ने 2005 मध्ये क्रिकेटमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वर्षभरातच हा नियम काढून टाकण्यात आला. आता बीसीसीआय त्याचा देशांतर्गत स्पर्धांमध्ये वापर करून आयपीएलमध्येही (IPL) आणण्याचा विचार करत आहे. या नियमामुळे खेळ अधिक रंजक होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

काय असतील नियम?
या नियमानुसार नाणेफेकीच्या वेळी, संघांना चार पर्यायांसह त्यांचे प्लेइंग-11 घोषित करावे लागेल. संघांना या चार पर्यायांपैकी एकच पर्याय वापरता येईल. संघ सामन्याच्या 14 व्या षटकापर्यंत पर्यायी खेळाडूला मैदानात पाठवू शकतात. यासाठी मैदानावर उपस्थित असलेल्या पंच किंवा चौथ्या पंचांना षटकाच्या शेवटी माहिती द्यावी लागेल. कॅप्टन /मुख्य प्रशिक्षक/संघ व्यवस्थापक यांपैकी कोणीही अम्पायरला हे सांगू शकतो. ज्या खेळाडूच्या जागी नवीन खेळाडू पाठवला जाईल, तो खेळाडू नंतर संपूर्ण सामन्यातून बाहेर राहील. म्हणजेच क्षेत्ररक्षण करतानाही तो दिसणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com