T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, सर्व सेलेक्टर्सची हकालपट्टी

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
Selectors
SelectorsDainik Gomantak

Indian Cricket Team: T20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर बीसीसीआयमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली. आता बीसीसीआयने आपल्या सर्व निवडकर्त्यांची हकालपट्टी केली असून नवीन अर्ज मागवले आहेत.

बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाला T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत 10 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. आता बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली आहे. चेतन शर्मा (उत्तर विभाग), हरविंदर सिंग (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबाशिष मोहंती (पूर्व विभाग) यांना वगळण्यात आले आहे. यापैकी काही सेलेक्टर्सची 2020 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

Selectors
T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, सर्व सेलेक्टर्सची हकालपट्टी

बीसीसीआयने नवीन अर्ज मागवले

बीसीसीआयने (BCCI) आपल्या निवेदनात म्हटले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नॅशनल सिलेक्टर (वरिष्ठ पुरुष) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या अर्जाचा विचार करण्यासाठी खालील निकष पूर्ण केले पाहिजेत.

Selectors
T20 World Cup 2024 साठी या खेळाडूला टीम इंडियाचा कर्णधार बनवा, दिग्गजांची मागणी

या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करु शकता

28 नोव्हेंबर 2022 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com