बीसीसीआयकडून हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेला मिळाले एवढ्या कोटींचे अर्थसाह्य

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

बीसीसीआयने वाटप केलेल्या रकमेतील सर्वात जास्त रक्कम हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेला मिळाली आहे. त्यांच्या खात्यात १६ कोटी २० लाख जमा करण्यात आले. त्यांना मिळालेली ही आगाऊ रक्कम आहे.

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या काळात जगाची अर्थव्यवस्था ढासळलेली असताना भारतीय क्रिकेट मंडळाने जुलै महिन्यात आपल्या संलग्न संस्था आणि त्यांचे ग्राहक यांना मिळून ४६ कोटी ८९ लाख रुपयांचा त्यांचा हिस्सा दिला, इतकेच नव्हे तर आयकर आणि जीएसटीचीही भरपाई केली.

बीसीसीआयने वाटप केलेल्या रकमेतील सर्वात जास्त रक्कम हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेला मिळाली आहे. त्यांच्या खात्यात १६ कोटी २० लाख जमा करण्यात आले. त्यांना मिळालेली ही आगाऊ रक्कम आहे. हिमाचल प्रदेश संघटना ही बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांची राज्य संघटना आहे.

हिमाचल प्रदेश संघटनेनंतर जास्त फायदा झारखंड क्रिकेट संघटनेचा झाला आहे, त्यांना १० कोटी ८० लाख मिळाले आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या