आयपीएल: 13 हंगाम संपताच 14व्याची तयारीही सुरू..!; आठ ऐवजी 9 संघांच्या सहभागाची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

एका मीडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय पुढील हंगामाच्या लिलावाची तयारी करत आहे. यावेळी आणखीन एक संघ वाढवण्यात आला असून एकूण ९ संघ यावेळी खेळणार असल्याची चर्चाही आहे.

 नवी दिल्ली- आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा जल्लोष असून संपलेला सुद्धा नाही तोच चौदाव्या हंगामाची घोषणा कऱण्यात आली आहे. या हंगामाचे आयोजन भारतात केले जाणार असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले. सुत्रांच्या माहितीनुसार कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी या हंगामात ९ संघ सहभागी करून घेतले जाणार आहेत. 

एका मीडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय पुढील हंगामाच्या लिलावाची तयारी करत आहे. यावेळी आणखीन एक संघ वाढवण्यात आला असून एकूण ९ संघ यावेळी खेळणार असल्याची चर्चाही आहे. कोरोनामुळे आलेला आर्थिक बोजा कमी करण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे मीडिया सुत्रांचे म्हणणे आहे. गुजरात, किंवा अहमदाबाद असे नवीन संघाचे नाव असण्याची शक्यता आहे.  

याआधी एका आयपीएलच्या हंगामात ९ संघ उतरले होते. तर एका हंगामात आतापर्यंतचे सर्वात जास्त १० संघ मैदानात उतरले होते. कोची टस्कर्स, पुणे सुपरजायंट, गुजरात लायन्स यांसारख्या संघांचा समावेश होता.     
 

संबंधित बातम्या