बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला डिस्जार्ज

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 7 जानेवारी 2021

आज गुरुवारी सकाळी सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. गांगुली यांना  रुग्णालयातून घरी सोडण्यात आले

कोलकाता : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज, गुरुवारी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केल्यावर कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे गांगुली यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर लगेच अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती.

जीममध्ये व्यायाम करत असताना सौरव गांगुलीना ह्रदयविकाराचा झटका आला. व्यायाम करताना चक्कर व छातीत दुखू लागल्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बाब उघडकिस आली होती. वूडलँड या खाजगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार झाले.

आज गुरुवारी सकाळी सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. गांगुली यांना  रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असले तरी डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीची दररोज माहिती घेतली जाणार आहे. उपचार करणारे डॉक्टर गांगुलीच्या प्रकृतीवर सतत नजर ठेवून आहेत आणि वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे रुग्णालयाने सांगितले आहे.

डिस्जार्ज मिळाल्यानंतर गांगुलीने रुग्णालयातील डॉक्टरांचे ” माझ्यावर वेळीच योग्य ते उपचार करणाऱ्या रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे धन्यवाद. माझी प्रकृती सध्या उत्तम आहे.” अशा शब्दात आभार मानले आहेत. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार वूडलँड रुग्णालयातील डॉक्टरांनी बुधवारीच गांगुलीला घरी जाण्याची परवानगी दिली होती. मात्र प्रकृती ठीक असतानाही गांगुली यांनी एक दिवस रुग्णालयातच राहण्याचा निर्णय घेतला होता.. गांगुली यांच्या प्रकृतीमध्ये झपाट्यानं सुधारणा होत असल्याने त्यांच्यावर होणारी अ‍ॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली आहे.

संबंधित बातम्या