बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींची दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी
BCCI President Sourav Ganguly Undergoes 2nd Angioplasty 2 More Stents Implanted

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींची दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी

कोलकाता : भारताचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) सौरव गांगुली यांच्यावर गुरुवारी कोलकातातील अपोलो ग्लेनिगल हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सौरव गंगुलींवर रक्तवाहिन्यांमधील प्रवाह सुरळित होण्यासाठी ही दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

2 जानेवारीला जीममध्ये व्यायाम करत असताना सौरव गांगुलीना ह्रदयविकाराचा झटका आला होता. व्यायाम करताना चक्कर व छातीत दुखू लागल्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बाब उघडकिस आली होती. त्यांच्यावर वुडलँड्स रुग्णालयातील डॉक्टर्सच्या टीमकडून पहिली अँजिओप्लास्टी करण्यात आली होते. त्यानंतर, परवा 27 जानेवारीला त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होते.

अपोलो अधिकाऱ्यांकडून काल जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, आफताब खान अश्विन मेहता, देवी शेट्टी, अजित देसाई, सरोज मंडळ आणि सप्तर्षी बसू यांच्या पथकाने सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी यशस्वीपणे पार पाडली आणि दोन स्टेंट लावले. “सौरव  गांगुलींची प्रकृती स्थिर असून,ते आता वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत”,असे निवेदनात म्हटले आहे. गुरुवारी सौरव गांगुलींना भेट देणार्‍या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ऑपरेशन यशस्वी झाले. मी सौरव आणि त्याची पत्नी डोना यांच्याशी बोलले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.” केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी बुधवारी गांगुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com