BCCI च पाकिस्तान क्रिकेटला चालवते

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) 50 टक्के बजेट आयसीसीच्या अनुदानातून येते, आयसीसीला (ICC) त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा बीसीसीआयकडून (BCCI) मिळतो.
BCCI च पाकिस्तान क्रिकेटला चालवते
पाकिस्तान क्रिकेटचा मास्टर देखील बीसीसीआय आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळच (BCCI) पाकिस्तान क्रिकेटला चालवत आहे. Dainik Gomantak

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) नवे अध्यक्ष रमीज राजा (Rameez Raja) यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुमारे दीड मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये रमीज राजा यांचा व्हिडियो व्हायरल होत आहे. यात ते म्हणाले, पाकिस्तान क्रिकेटचा मास्टर देखील बीसीसीआय आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळच (BCCI) पाकिस्तान क्रिकेटला चालवत आहे. जर बीसीसीआयने आयसीसीला (ICC) निधी देणे बंद केले तर पीसीबी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो. असेही त्यांनी यात नमूद केले आहे.

पाकिस्तान क्रिकेटचा मास्टर देखील बीसीसीआय आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळच (BCCI) पाकिस्तान क्रिकेटला चालवत आहे.
या गोष्टींसाठी आमच्याकडे वेळच नाही, BCCI ने PCB ला फटकारलं

पीसीबीचे नवीन अध्यक्ष रमीज राजा यांनी खुलासा केला आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या 50 टक्के बजेट आयसीसीच्या अनुदानातून येते, आयसीसीला त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा बीसीसीआयकडून मिळतो. अशा परिस्थितीत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीवरील अवलंबित्व कमी करण्याची वेळ आली आहे. रमीज राजा यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ भाजप नेते आणि आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पोस्ट केला आहे.

पाकिस्तान क्रिकेटचा मास्टर देखील बीसीसीआय आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळच (BCCI) पाकिस्तान क्रिकेटला चालवत आहे.
BCCI ची PCB वर मात, IPL मध्ये न्यूझीलंडचे खेळाडू होणार सहभागी

या व्हायरल व्हिडीओमध्ये रमीज राजा म्हणाले, मला भीती वाटते की जर भारताने निधी थांबवला तर पीसीबी कोसळू शकेल. कारण आयसीसीला पाकिस्तानकडून शून्य टक्के निधी मिळतो. या बैठकीत रमीज राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला स्वावलंबी होण्याचे स्वप्न दाखवत आहेत. संपूर्ण जगाला माहित आहे की पीसीबीची स्थिती काय आहे. कोणत्याही देशाला पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळायचे नाही. अलीकडेच, न्यूझीलंड आणि इंग्लंडनेही पाकिस्तान दौरा रद्द केला, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटला खूप तोटा सहन करावा लागला आहे.

भारत पाकिस्तान 24 ऑक्टोबरला लढत

टी -20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध मोहिमेला सुरुवात करतील. हा हाय व्होल्टेज सामना 24 ऑक्टोबरला खेळण्यात येणार आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील ही लढत दुबईमध्ये रंगेल. रमीज राजा म्हणाले की, पाकिस्तानच्या एका मोठ्या उद्योजकाने त्यांना वचन दिले आहे की जर पाकिस्तानने विश्वचषकात भारताला पराभूत केले तर तो कोरा चेक देणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com