कोहलीच्या कर्णधारपदाचे 'विराट' भवितव्य; बीसीसीआयच्या सचिवांचा मोठं विधान

त्यांनी (Jay Shah) आपल्या वक्तव्याने टी -20 वर्ल्डकपच्या अगोदर निर्माण झालेले सर्व कंफ्यूजन दूर केले आहे.
कोहलीच्या कर्णधारपदाचे 'विराट' भवितव्य; बीसीसीआयच्या सचिवांचा मोठं विधान
Virat KohliDainik Gomantak

टी -20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) विराट कोहलीचे (Virat Kohli) कर्णधारपद पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. आयसीसी टूर्नामेंटनंतर, टी -20 आणि एकदिवसीय सामन्यातून त्याने कर्णधारपदाचा त्याग केला असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये एक रिपोर्ट म्हणून चर्चेत येऊ लागल्या. तेव्हा कर्णधार कोहलीबद्दल सट्टा बाजारात मोठी बेटींगही पाहायला मिळाली. तेव्हा प्रथम BCCI चे ट्रेजरर अरुण धुमाळ (Arun Dhumal) समोर आले आणि त्यांनी IANS ला सांगितले की, हे सर्व दावे निराधार आणि मूर्खपणाचे आहे. परंतु, त्यानंतरही, विराटच्या एकदिवसीय आणि टी -20 कर्णधारपदाबद्दल काही शंका असल्यास, आता फक्त बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांच्याकडेच लक्ष द्या आणि त्यांचेच फक्त ऐका. बीसीसीआयच्या सचिवांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाचे भविष्य ठरवले आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याने टी -20 वर्ल्डकपच्या अगोदर निर्माण झालेले सर्व कंफ्यूजन दूर केली आहेत.

Virat Kohli
T20 World Cup: 'भारताविरुद्ध विजयासह सुरुवात करण्यास तयार': Babar Azam

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीवर भर देताना सांगितले की, "जोपर्यंत संघ कामगिरी करत आहे. त्याचबरोबर उत्तमोउत्तम परफॉर्मेन्स देत असून कर्णधारपद बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.'' विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्याच्या आणि टीम इंडियात कर्णधारपदाचे विभाजन झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आल्या तेव्हा शहा यांचे हे वक्तव्य आले आहे. त्या अहवालात असे म्हटले होते की, विराट कोहली टी -20 विश्वचषकानंतर रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि टी -20 मध्ये आपले कर्णधारपद सोपवेल. आणि तो फक्त कसोटी क्रिकेटचा कर्णधार असेल.

कोहलीेचे कर्णधारपद कमाल, ICC ट्रॉफी लक्ष्य

कर्णधारपदाला संघाच्या कामगिरीशी जोडत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या 2-1 ने घेतलेल्या आघाडीबद्दल शहा विशेषरित्या बोलले. याशिवाय, त्यांनी कोहलीच्या संघाने टी -20 क्रिकेटमधील कामगिरीचं कौतुकही केलं. ते पुढेही म्हणाले की, कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्येही उत्तमोउत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध 3–2 मालिका जिंकली, ऑस्ट्रेलियामध्ये 2-1 जिंकले, श्रीलंकेला 2-0 ने पराभूत केले आणि न्यूझीलंडला 4-0 ने पराभूत केले. मात्र, विराट कोहलीसमोर आयसीसी स्पर्धा जिंकणे हे अजून एक मोठे आव्हान आहे.

Virat Kohli
T20 World Cup: डु प्लेसिस, ताहिर आणि मॉरिसला दक्षिण अफ्रीका संघातून डच्चू!

भारताने गेल्या आठवड्यातच टी -20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. यावेळी बीसीसीआयने धोनीची मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे. त्यामुळे येत्या टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेमध्ये धोनीच्या अनुभवाचा चांगलाच फायदा टीम इंडियाला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले असून त्याला 'मास्टर स्ट्रोक' म्हटले जात आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com