India vs Australia Test: नागपूर कसोटीपुर्वी धक्का! दुखापतीमुळे 3 खेळाडू संघातून बाहेर

श्रेयस अय्यरला पाठीची दुखापत
India vs Australia Test
India vs Australia TestDainik Gomantak

India vs Australia First Test Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी दुखापतग्रस्त खेळाडूंनी चिंता वाढवली आहे. 9 फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ कालावधीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

India vs Australia Test
WPL: 'या' दिवशीपासून रंगणार बीसीसीआयच्या पहिल्या महिला प्रीमियर लीग T-20 चा थरार

नागपुरात होणाऱ्या या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना धक्का बसला आहे. टीम इंडियाचा एक आणि ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे पहिल्याच सामन्यापुर्वी 3 मोठे खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर पडले आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे तिकीट निश्चित करण्यासाठी, टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे, परंतु दुखापतीमुळे टीम इंडियासमोरील आव्हानात वाढ झाली आहे. पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी या काळात नागपुरमध्ये होणार आहे.

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याला दुखापत झाली होती. त्यानंतरपासून तो संघाबाहेर आहे.

गेल्या काही महिन्यांत श्रेयस अय्यरने संघासाठी उपयुक्त खेळी केली आहे. आता त्याच्या दुखापतीचा परिणाम संघबांधणीवर होणार आहे.

India vs Australia Test
PM Modi Messi Jersey: पंतप्रधान मोदींना बंगळूरमध्ये मिळाले खास गिफ्ट

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही बोटाच्या दुखापतीने त्रस्त आहे. पहिल्या सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होऊ शकणार नाही. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा आणखी एक वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड देखील जखमी आहे.

त्यामुळे तो देखील नागपूर कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे भारताविरूद्धच्या या मालिकेतील पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियालादेखील मोठा धक्का बसला आहे.

नागपूरची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना उपयुक्त ठरणार आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा नॅथन लिऑन भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सुचनेनुसार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुलसारखे फलंदाज नेट सेशनमध्ये स्वीपसोबतच रिव्हर्स स्वीपचाही सराव करत आहेत.

गेल्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतनेही अशाच पद्धतीने कांगारूच्या गोलंदाजांचा सामना केला होता. पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जी युक्ती वापरली होती तीच युक्ती भारतीय फलंदाजांनी वापरावी, अशी द्रविडची इच्छा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com