इंग्लंडच्या पराभवाचा बेन स्टोक्सने केला खुलासा

इंग्लंडच्या पराभवाचा बेन स्टोक्सने केला खुलासा
Ben Stokes reveals Englands defeat

भारत- इंग्लड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान त्याचे आणि त्याच्या साथीदारांचे वजन खूप कमी झाले असल्याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, 41- डिग्री उष्णतेमध्ये खेळल्यामुळे पोटाचे आजार उद्भवले. कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात पाहुण्य़ा संघाला मोठ्य़ा पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडने चार कसोटी सामन्यांची मालिका 1-3  अशा फरकाने गमावली. गेल्या आठवड्य़ातील अंतिम सामना एक डाव आणि 25 धावांनी गमावला होता.

बेन स्टोक्सने युकेतील डेली मिररशी बोलताना म्हटले की, ''संघातील काही खेळाडू आजाराने त्रस्त असल्यामुळे मैदानावर संघर्ष करत होते. हे कोणत्याही प्रकारचे कारण नाही आमच्यातील प्रत्येक जण खेळण्यासाठी तयार होता. यातच भारताने आणि ऋषभ पंत यांनी उत्तम कामगिरी केली. आपलं सगळ सर्वस्व पणाला लावून फक्त इंग्लंड जिंकावा यासाठी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी हॅट्स ऑफ'' असं स्टोक्स म्हणाला.

''आपला कर्णधार, आपले कोच, आणि आपल्या सहकाऱ्यांची मते खरोखर महत्त्वाची असतात जी की, तुम्हाला एक चांगला संघ, आणि चांगला खेळाडू म्हणून घडवतात.'' स्टोक्स पुढेही म्हणाला, 'कसोटी मालिकेत झालेला पराभवामुळे संघातील तरुणांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत नक्कीच होईल. 

''बऱ्याच नवोदीत खेळांडूसाठी पहिला भारत दौरा होता आणि तो एक शिकवण ठरला आहे. परंतु या पातळीवर हा अनुभव एक क्रिकेटपटू होण्याचा भाग आहे. या कठीण क्षणाला तुम्ही कसे सामोरे जाता याची खरी चाचणी असणार आहे,'' असही स्टोक्स म्हणाला.  
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com