बंगळूर एफसी नव्या मोसमात आशावादी

नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीचे माजी आयएसएल विजेत्यांचे लक्ष्य
बंगळूर एफसी नव्या मोसमात आशावादी
Bengaluru FC optimistic in new season Dainik Gomantak

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत बंगळूर एफसी संघाला सर्वाधिक यशस्वी मानले जाते. माजी विजेता संघ नव्या मोसमात प्रगती साधण्यासाठी आशावादी आहे. बंगळूर एफसीसाठी आयएसएल स्पर्धेचा गतमोसम लौकिकास साजेसा ठरला नाही. त्यांना उपांत्य फेरी गाठण्यास अपयश आले. बंगळूर एफसी संघ 2017 साली आयएसएल स्पर्धेत दाखल झाला, तेव्हापासून गतमोसमाचा अपवाद वगळता प्रत्येकवेळी त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.

मार्को पेझ्झाईयोली यांनी नव्या मोसमापूर्वी बंगळूर एफसीच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. ते 52 वर्षांचे आहेत. खेळाडू संघ बदल प्रक्रियेत बंगळूरने गुणवान खेळाडूंना करारबद्ध केले, त्यामुळे मार्को यांना चांगला संघ उपलब्ध झाला आहे. जर्मनीत जन्मलेले इटालियन मार्को यांनी प्रशिक्षक या नात्याने यापूर्वी जर्मनी, दक्षिण कोरिया, जपान, चीनमध्ये काम केले आहे. आता आपल्या अनुभवाचा लाभ भारतीय फुटबॉलच्या प्रगतीसाठी वापरण्यास ते इच्छुक आहेत.

Bengaluru FC optimistic in new season
गोव्याच्या महिलांसमोर पंजाबच्या फलंदाजीचे आव्हान

‘‘बंगळूर एफसीचा भाग बनणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. संघाला पुन्हा अव्वल स्थानी आणण्याच्या आव्हानाने मी उत्साहित झालो आहे. जीवन आणि फुटबॉलमध्ये मी नेहमीच अनुभवप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो. भारतीय फुटबॉलच्या वाढीस मदत करताना माझा अनुभव वाटण्यास मी इच्छुक आहे,’’ असे मार्को यांनी आयएसएल संकेतस्थळास सांगितले. यावेळच्या आयएसएल स्पर्धेत बंगळूर एफसीचा पहिला सामना येत्या 20 नोव्हेंबर रोजी बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल.

बंगळूरची आयएसएल कामगिरी

बंगळूरने 2018-19 मोसमात आयएसएल स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी एफसी गोवास नमविले. त्यापूर्वी पदार्पणाच्या मोसमात त्यांनी साखळी फेरीत अव्वल स्थान मिळविले, मात्र अंतिम फेरीत चेन्नईयीन एफसीकडून पराभव स्वीकारल्यामुळे विजेतेपदाचा करंडक निसटला. 2019-20 मोसमात सलग तिसऱ्यांदा त्यांनी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्या मोसमात त्यांना तिसरा क्रमांक मिळाला. 2020-21 मोसम त्यांच्याशी खराब ठरला. प्रथमच त्यांना उपांत्य फेरी गाठण्यास अपयश आले. 22 गुणांसह त्यांना गुणतक्त्यात सातवा क्रमांक मिळाला.

Bengaluru FC optimistic in new season
वनडेतूनही विराट कर्णधारपदावरुन होणार पायउतार! शास्त्रींचा दावा

संघातील प्रमुख खेळाडू

य्रोंडू मुसावू-किंग हा बंगळूर एफसी संघातील नवा बचावपटू आहे. तो गॅबोन देशातील आहे. भारताचा कर्णधार, सर्वांत यशस्वी स्ट्रायकर सुनील छेत्री बंगळूर एफसीच्या आक्रमणातील प्रमुख खेळाडू आहे. आयएसएल स्पर्धेत सर्वाधिक 48 गोल करणाऱ्या फेरान कोरोमिनास याला मागे टाकण्यासाठी छेत्री याला दोन गोलची आवश्यकता आहे. बंगळूर एफसीतर्फे पहिल्याच मोसमात 34 वर्षीय ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने 7 गोल व 4 असिस्ट अशी चमकदार कामगिरी केली. ब्रुनो रमिरेस हा बंगळूर संघातील आणखी एक प्रमुख खेळाडू आहे. हा 32 वर्षीय मध्यरक्षक ब्राझील व पोर्तुगालमध्ये भरपूर व्यावसायिक फुटबॉल खेळला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com