काणकोण स्पोर्टस अकादमीच्या अध्यक्षपदी भंडारी

किशोर पेटकर
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

पायाभूत पातळीवरील क्रीडा गुणवत्तेला खतपाणी घालण्यासाठी प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा उपक्रम-महोत्सव घेण्याचा सूचना व्यंकटराय नाईक यांनी केली.

पणजी,

जनार्दन भंडारी यांची काणकोण स्पोर्टस अकादमीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. पैंगीण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयात रविवारी अकादमी वार्षिक आमसभा झाली. त्यात ३२ आजीव सदस्यांनी भाग घेतला.
आमसभेत जनार्दन भंडारी यांनी स्वागत केले. सचिव शरेंद्र नाईक यांनी मागील आमसभेचे इतिवृत्त मांडले. खजिनदार रत्नाकर रायकर यांनी २०१९-२० आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. त्यास आमसभेने मान्यता दिली. आमसभेत नंतर नवी व्यवस्थापकीय समिती निवडण्यात आली.
राज्यातील कोविड-१९ परिस्थितीमुळे २०२०-२१ वर्षाचे नियोजन सादर करणे शक्य नसल्याचे सचिव शरेंद्र यांनी आमसभेला सांगितले. ऑनलाईन उपक्रमांवर भर राहील असे त्यांनी नमूद केले. राज्य विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या सहकार्याने पोटके-पैंगीण येथील पंचायत मैदान आणि काणकोण तालुक्यातील इतर मैदानांचा विकास करण्याची सूचना सतीश पैंगीणकर यांनी मांडली. पायाभूत पातळीवरील क्रीडा गुणवत्तेला खतपाणी घालण्यासाठी प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा उपक्रम-महोत्सव घेण्याचा सूचना व्यंकटराय नाईक यांनी केली.
काणकोण स्पोर्टस अकादमीची नवी कार्यकारिणी ः अध्यक्ष ः जनार्दन भंडारी, उपाध्यक्ष ः सौरभ कामत (दक्षिण काणकोण) व रामदास सावंत (उत्तर काणकोण), सचिव ः शरेंद्र नाईक, खजिनदार ः सुनील पैंगीणकर, संयुक्त सचिव ः प्रविर भंडारी, कार्यकारी सदस्य ः रत्नाकर रायकर, सतीश पैंगीणकर, व्यंकटराय नाईक, दुर्गेश गावकर, किशोर बांदेकर.

संपादन - तेजश्री कुंभार 

 

संबंधित बातम्या