एका कॅचने मॅचला वेगळे वळण, भरतकडे नवीन जबाबदारी!

तिसऱ्या दिवशी भरतकडे विकेट किपींगची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
Cricket
CricketDainik Gomantak

केएस भरत (Srikar Bharat) हा भारतीय कसोटी संघाचा (Indian Test team) भाग आहे. भरत देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Cricket) आंध्र क्रिकेट संघासाठी (Andhra Cricket Team) विकेटकिपर (Wicket keeper) म्हणून खेळतो. त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळाली नसली तरी या सामन्यात भारताचा विकेटकिपर ऋद्धिमन साहा जायबंदी झाल्याने भरत त्याच्या जागी विकेटकिपींग करण्यासाठी मैदानात उतरला. भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये (Kanpur) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भरतकडे विकेटकिपींगची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेल्या ऋद्धिमन साहाच्या (Wriddhiman Saha) मानेला झालेली दुखापत झाली आहे. याच कारणामुळे भरतला ग्लोव्हज घालण्याची संधी मिळाली आहे आणि त्याने या संधीचे सोने करत उत्कृष्ट झेल घेत भारताला सामन्यात पुन्हा आणले.

Cricket
बुद्धिबळपटू नीतिश हंगेरीत विजेता

भारतीय गोलंदाज (Indian bowlers) विकेट्ससाठी खुप आसुसले होते. टॉम लॅथम आणि विल यंग ही जोडी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत होती. अशा परिस्थितीत भरतने अप्रतिम झेल घेऊन टीम इंडियाला यश मिळवून दिले. पिच'च्या अन्इव्हन बाऊंन्समुळे विकेटकिपींग करणे अवघड जात असले तरी भरतने अप्रतीम कॅचेस घेतले.

मात्र, अंपायर ने तो कैच आऊट दिला नाही. येथे भरतने संघाला आश्वासन दिले आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) रिव्ह्यू घेतला ज्यामध्ये चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागल्याचे स्पष्ट झाले. या कैचनंतर अनेकांनी भरतचे कौतुक केले. व्हीव्हीएस लक्ष्मणने कॉमेंट्री करत भरतच्या कौतुकाचेही पूल बांधले.

भरतच्या रिव्ह्यू घेण्याच्या निर्णयाने यंगच्या (Will Young) पहिल्या शतकाच्या आशा धुळीस मिळवल्या. यंगने सुरुवातीपासूनच उत्तम फलंदाजी केली होती आणि तो भारतीय गोलंदाजांना सहजतेने खेळवत होता. यंगने आतापर्यंत एकही कसोटी शतक झळकावलेले नाही. कानपूरमध्ये त्याचे स्वप्न पूर्ण होईल असे वाटत असतानांच अश्विन आणि भरतच्या उत्कृष्ट किपींगमुळे त्याचे स्वप्न भंग झाले. यंगने 214 चेंडूंचा सामना करत 15 चौकारांच्या मदतीने 89 धावा केल्या. त्याने टॉम लॅथमसोबत 151 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने न्यूझीलंडला मजबूत स्थितीत आणले.

यावेळी केएस भरतला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून (Royal Challengers Bangalore) आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संघासोबत खेळताना त्याने आपल्या विकेटकीपिंगने सर्वाना प्रभावित केले तसेच आपल्या झंझावत्या फलंदाजीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवून दिला होता. 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती. या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भरतने बंगळुरूला विजय मिळवून दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com