बिबियान यांना चांगल्या कामगिरीचा विश्वास

Dainik Gomantak
रविवार, 21 जून 2020

एएफसी १६ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत भारत कठीण गटात

पणजी 

 एएफसी १६ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत भारताचा कठीण गटात समावेश असलातरी आपला संघ चांगली कामगिरी बजावेलअसा विश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक बिबियान फर्नांडिस यांनी व्यक्त केला आहे.

बहारीनमध्ये या वर्षी होणाऱ्या एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेत भारताच्या क गटात दक्षिण कोरियाऑस्ट्रेलियाउझबेकिस्तान या बलाढ्य संघांचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी या स्पर्धेत बिबियान यांच्या मार्गदर्शनाखालीच भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली होतीपण दक्षिण कोरियाने एका गोलने विजय मिळविल्यामुळे भारतीय संघाची वाटचाल खंडित झाली होती. यंदा भारत सलग तिसऱ्यांदातर एकूण नवव्यांदा एएफसी १६ वर्षांखालील मुख्य स्पर्धेत खेळणार आहे.

स्पर्धेची गटवारी निश्चित झाल्यानंतर बिबियानने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) संकेतस्थळावर आपले मत व्यक्त केले. पात्रता फेरीत खेळाडूंनी चांगला खेळ केलात्यामुळे आता या गटातील देशांविरुद्ध आपला संघ उल्लेखनीय कामगिरी करू शकतोअसा विश्वास बिबियान यांनी व्यक्त केला. पात्रता फेरीत भारताने उझबेकिस्तानला १-१ असे गोलबरोबरीत रोखले होते.

कोरोना विषाणू महामारीमुळे खेळाडू सध्या इनडोअर आहेत. स्पर्धेच्या तयारीनिमित्त लवकर प्रशिक्षण सत्र सुरू होणे आवश्यक असल्याचे मत बिबियान यांनी मांडले. देशातील फुटबॉल कोविड-१९ मुळे मार्चपासून स्थगित आहे.

कोविड-१९ मुळे भारतीय संघातील खेळाडू सरावापासून दूर असलेतरी आपण ऑनलाईन माध्यमांद्वारे खेळाडूंच्या संपर्कात असल्याचे बिबियान यांनी नमूद केले. आठवड्यांतून तीन वेळा खेळाडूंचे ऑनलाईन सत्र घेतले जातेत्यात सामर्थ्यगोलरक्षणचेंडूवरील प्रभुत्व यांचा समावेश असतो. १६ वर्षांखालील गटातील सामने पाहून त्या लढतींचे खेळाडूंसह विश्लेषणात्मक चर्चाही होतेअसे बिबियान यांनी नमूद केले.

 भारतीय मुलांचा प्रभावी खेळ

बिबियान यांच्या मार्गदर्शनाखालील १६ वर्षांखालील संघाने सलग आठ सामने अपराजित राहण्याचा पराक्रम साधला आहे. १५ वर्षांखालील सॅफ करंडक स्पर्धेत संघाने ओळीने पाच सामने जिंकलेतर एएफसी १६ वर्षांखालील पात्रता फेरीत दोन विजय व एक बरोबरी अशी कामगिरी बजावली. १५ वर्षांखालील स्पर्धेत भारताने एकही गोल न स्वीकारता तब्बल २८ गोल नोंदविले होते. गतवर्षी ताश्कंद येथे झालेल्या एएफसी १६ वर्षांखालील पात्रता फेरीच्या ब गटात भारतासह यजमान उझबेकिस्तानबहारीनतुर्कमेनिस्तान या संघांचा समावेश होता. भारताने तीन लढतीतून सात गुणांची कमाई करताना ११ गोल नोंदविले व फक्त एकच गोल स्वीकारला.

 

 

संबंधित बातम्या