खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याच्या कामगिरीत मोठी घसरण

योगासनातील दोन सुवर्णांसह तीन पदकाचाच दिलासा
Khelo India Youth Games
Khelo India Youth GamesDainik Gomantak

Khelo India Youth Games : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये यावेळी गोव्याच्या कामगिरीत प्रचंड घसरण झाली. स्वदेशी खेळ योगासनात दोन सुवर्णांसह जिंकलेल्या तीन पदकांचाच दिलासा मिळाला. प्रमुख खेळातील अपयश सलणारे ठरले, त्यामुळे एकूण पदकांची संख्या कमी झाली.

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये प्रथमच समावेश करण्यात आलेल्या योगासनात गोव्याने दोन सुवर्ण व एका रौप्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदकांच्या बाबतीत पदकांत वाढ झाली, मात्र जास्त आशा असलेल्या फुटबॉल, जलतरण, बॉक्सिंग या खेळांत प्रचंड निराशा पदरी पडली. गुवाहाटी येथे मागील स्पर्धेत गोव्याने तीन रौप्य व नऊ ब्राँझसह एकूण 12 पदके जिंकली होती, तर त्यापूर्वी पुण्यात एकूण 16 पदके मिळाली होती.

Khelo India Youth Games
धुलई धारबांदोडा येथे गव्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

हरियाणातील पंचकुला येथे सुरू असलेल्या स्पर्धेत गोव्याचे आव्हान शनिवारीच संपुष्टात आले. खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पुणे व गुवाहाटी येथे पदक जिंकलेली गोव्याची बॉक्सर सुमन यादव हिचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

52 किलो फ्लायवेट वजनगटात तिला महाराष्ट्राची आशियाई रौप्यपदक विजेती सिमरन वर्मा हिच्याकडून 5-0 फरकाने पराभव पत्करावा लागला. मुलांच्या 67 किलो वेल्टरवेट वजनगटात गोव्याच्या साहिल वैदांडे याला मध्य प्रदेशच्या मोहित कुंजार याने उपांत्यपूर्व फेरीत हरविले. ही लढत रेफरीने दुसऱ्या फेरीतच थांबविली.

दिल्लीतील खेलो इंडिया स्कूल गेम्समध्ये पदक जिंकलेली गोव्याची बॉक्सर आश्रेया नाईक हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. 66 किलो वेल्टरवेट वजनगटात हरियानाच्या मुस्कान हिने आश्रेयावर 5-0 फरकाने मात केली.

आश्रेयाच्या लढतीचा निकाल धक्कादायक व निराशाजनक ठरला, कारण दोन्ही बॉक्सरमध्ये आश्रेया सर्वोत्तम होती व ती जिंकण्यास लायक होती, असे गोव्याचे प्रशिक्षक वालंका व संतोष यांनी नमूद केले.

जलतरणातही पदकाविना

गोव्याची पंधरा वर्षीय आंतरराष्ट्रीय पदक विजेती जलतरणपटू संजना प्रभुगावकर हिला स्पर्धेत पदकाविना राहावे लागले. प्रकृती अस्वास्थाचा तिच्या कामगिरीवर परिणाम झाला.

शनिवारी 200 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीपूर्वी तिला वैद्यकीय कारणास्तव स्पर्धा रेफरीने माघार घेण्याचा सल्ला दिला, पण त्यास न जुमानता ती धीटपणे सहभागी झाली, शर्यत पूर्ण करताना 2 मिनिटे 59.24 सेकंद वेळेसह तिला चौथा क्रमांक मिळविला. स्पर्धेतील यापूर्वीच्या शर्यतीत तिला 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये चौथा, तर 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पाचवा क्रमांक मिळाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com