IND vs ENG : रिषभ पंत-अक्षर पटेलवर वर नजरा खिळल्या; मोठ्या खेळीची अपेक्षा

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

रोहित शर्माच्या 161  धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या क्रिकेट कसोटीच्या पहिल्याच दिवशी शनिवारी चेपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारताने 6 बाद 300 धावा केल्या. 

चेन्नई :  रोहित शर्माच्या 161  धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या क्रिकेट कसोटीच्या पहिल्याच दिवशी शनिवारी चेपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारताने 6 बाद 300 धावा केल्या. अजिंक्य रहाणेने 149 चेंडूत 67 धावा फटकावत रोहितबरोबर चांगली खेळी केली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली. कोरोना साथीनंतर या सामन्यासाठी प्रेक्षक भारताच्या क्रिकेट मैदानावर परतले आहेत. या खेळपट्टीवर 350 ची धावसंख्या देखील चांगली मानली जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रिषभ पंत 33 आणि अक्षर पटेल 5 धावांवर खेळत होते. 

ISL 2021: पुन्हा एकदा ईशान `लकी सुपर सब` एफसी गोवाने पिछाडीवरून इंज्युरी गोलमुळे चेन्नईयीनला रोखले

आज दोन्ही फलंदाजांकडून मोठा डाव अपेक्षित आहे. रोहितने 18 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 231 चेंडूंचा सामना करत आपले सातवे कसोटी शतक झळकावत 161 धावा केल्या. 227 धावांनी पहिली कसोटी गमावल्यानंतर भारताची दुसऱ्या कसोटी सामन्यातही चांगली सुरुवात झाली नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीची निवड करणाऱ्या भारतीय संघाने नवव्या चेंडूवर विकेट गमावली तेव्हाच स्टोननी शून्य धावांवरच शुभमन गिलला पॅव्हेलियमध्ये पाठवले. पण रोहितने डावाच्या आघाडीची भूमिका चांगली पार पाडली. पहिल्या सत्रात त्याने आक्रमक खेळ केला आणि 78 चेंडूत 80 धावा केल्या. 

IND Vs ENG: भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल; टिम इंडियाला पहिला झटका

त्याने स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवरही षटकार ठोकले. पहिल्या दोन सत्रात इंग्लंडचा संघ केवळ तीन विकेट घेण्यात यशस्वी ठरला आणि अखेरच्या सत्रात तीन गडी राखून परतला. मोईन अलीच्या हातात जॅक लीचने रोहितला झेल देऊन आपली विकेट गमावली.यानंतर रहाणेही जास्त काळ टिकू शकला नाही आणि 67 धावा करून अलीचा बळी ठरला. त्याने 149 चेंडूत 9 चौकार ठोकले

संबंधित बातम्या