डेल स्टेनच्या वक्तव्यावर अजिंक्य रहाणेची मोठी प्रतिक्रीया

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

डेल स्टेनने पाकिस्तानमध्ये खेळली जात असलेली टी 20 स्पर्धा ही इंडियन प्रिमिअर लिगपेक्षा उत्कृष्ठ असल्याचे म्हटले होते.

अहमदाबाद : भारत- इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रहाणेने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन उपस्थित केलेल्य़ा प्रश्नाला चोख उत्तर दिले, डेल स्टेनने पाकिस्तानमध्ये खेळली जात असलेली टी 20 स्पर्धा ही इंडियन प्रिमिअर लिगपेक्षा उत्कृष्ठ असल्याचे म्हटले होते. यावर रहाणे म्हणाला, इंडियन प्रिमिअर लिगनेच विदेशी खेळाडूंना संधी दिली.

भारत- इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडीयम होणार. यापूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने क्रिकेटची खेळपट्टी आणि त्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने केलेल्या वक्तव्यामुळे जगभरात याची चर्चा झाली.

INDvsENG : खेळपट्टीवरून व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी इंग्लंडला फटकारलं

रहाणे पुढे म्हणाला, ''आयपीएलमुळे भारतीय आणि विदेशी खेळाडूंना नवी ओळख मिळाली. आयपीएल सारख्या मंचावर सगळ्या खेळाडूंना आपला हुनर दाखवता येतो. मात्र मला माहित नाही की, डेल स्टेन नेमके काय बोलला, त्यामुळे आपण आता चौथ्या कसोटी सामन्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो असून त्यावर बोलू.'' 

14 व्या आयपीएल हंगामात डेल स्टेन याने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेन म्हणाला, ''मोठा संघ, खूप सारा पैसा, मोठं नाव या गोष्टी आयपीएलमध्ये खेळत असणाऱ्या खेळाडूंना क्रिकेटपासून दूर घेऊन जातात.''     

संबंधित बातम्या