Protest in England
Protest in EnglandDainik Gomantak

लंडनमध्ये WTC Final पूर्वी आंदोलकांनी घातला गोंधळ, पोलिसांनी खेळाडूंना वाचवले!

Protest in England: याआधीच गुरुवारी लंडनमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. आंदोलकांनी टीम बसच अडवली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवले.

WTC Final 2023: भारतीय संघ सध्या लंडनमध्ये आहे. धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) चा अंतिम सामना खेळायचा आहे, जिथे ऑस्ट्रेलियाकडून कडवे आव्हान असेल.

याआधीच गुरुवारी लंडनमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. आंदोलकांनी टीम बसच अडवली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवले.

टीमची बस थांबवली

दरम्यान, इंग्लंडचा (England) संघ सध्या आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी (ENG vs IRE 1st Test) सामना खेळत आहे. याच सामन्यासाठी गुरुवारी इंग्लंडचा संघ लॉर्ड्सला जात असताना आंदोलकांनी संघाची बस अडवली.

इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. त्याने एक फोटो देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये पोलीस (Police) टीमच्या बससमोर उभे असलेले दिसत आहेत.

Protest in England
WTC Final 2023: आधी कहर केला.. आता दहशत निर्माण करणार, 'या' धाकड खेळाडूने कांगारुंची उडवली झोप!

लंडनमध्ये निदर्शने होत आहेत

लंडनमध्ये 'जस्ट स्टॉप ऑइल' बाबत निदर्शने केली जात आहेत. यूके सरकारने नवीन तेल, वायू आणि कोळसा प्रकल्पांशी संबंधित सर्व परवाने आणि मंजूरी थांबवण्याची मागणी आंदोलक करत आहेत.

Protest in England
WTC Final फायनलपूर्वी भारताला मोठा झटका! टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक दुखापतग्रस्त

सामना वेळेवर सुरु झाला

दुसरीकडे, 'जस्ट स्टॉप ऑइल' च्या बाबतीत आंदोलक रस्त्याच्या मधोमध बसला घेराव घालताना यावेळी दिसले. मात्र, बस वेळेवर लॉर्ड्सला पोहोचल्याने सामना सुरु होण्यास उशीर झाला नाही.

या सामन्यात इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून आयर्लंडला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.

आयर्लंडच्या पहिल्या डावात 98 धावांवर 5 विकेट्स पडल्या, त्यापैकी 4 विकेट्स वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com