T20 WC: 'बिलियन डॉलर लीग क्रिकेटपेक्षा पाकिस्तानी संघ उत्कृष्ट' रमीज राजाने चोळले भारताच्या जखमेवर मीठ

रमीज राजा यांनी देखील भारतीय संघाची खिल्ली उडवत पाकिस्तान संघाचे कौतुक केले आहे.
Rameez Raja
Rameez RajaDainik Gomantak

T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. यामुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला असून, आता पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. दरम्यान भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीवर सर्व स्तरातून टीका होत आहे. यात पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, यावर आता पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी देखील भारतीय संघाची खिल्ली उडवत पाकिस्तान संघाचे कौतुक केले आहे.

Rameez Raja
Ayesha Omar शोएब मलिकची कथित गर्लफ्रेन्ड

पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे. पाकिस्तानचे खेळाडू बिलियन डॉलर लीगच्या क्रिकेटपटूंपेक्षा उत्कृष्ट ठरले आहेत. असे रमीज राजा ऑस्ट्रेलियात आल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

राजा म्हणाले, 'बिलियन डॉलर्सचा उद्योग असलेला क्रिकेट संघ मागे राहिला आणि आम्ही वर आलो आहोत. याचा अर्थ आम्ही काहीतरी चांगले करत आहोत. त्यामुळे या यशाचा आनंद घ्या आणि त्याचा आदर करा. आपण स्वत:वर संशय घेत असतो. तुम्ही पाहा की, जागतिक क्रिकेट किती मागे राहिलंय आणि पाकिस्तान किती पुढे निघाला आहे.'

Rameez Raja
Cattle Slaughtering Goa: गोवंश कत्तल! गोवा सरकार जनावरांच्या वाहतुकीवरील बंदी उठवणार

बाबर आझमचा आजचा पाकिस्तान संघ आणि इम्रान खानचा 1992 चा विश्वचषक विजेता संघ यांच्यातील साम्य पाहून मला आश्चर्य वाटते, असेही राजा म्हणाले. बाबरच्या संघात 92 च्या संघासारखाच आत्मविश्वास आहे. संघ विश्वचषक विजयासाठी मेहनत घेत आहे. 1992 च्या विश्वविजेत्या संघाची विचारसरणीही अशीच होती. विरोधी संघ 15 खेळाडूंसह खेळला तरी आम्ही हरणार नाही, हे आम्हाला माहीत होते. असे रमीज राजा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com