Birthday Special: हिटमॅनची हीट ''लव्ह स्टोरी''

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

भारतीय क्रिकेट संघात हिटमॅन (Hitman) म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटपटू रोहित शर्माचा आज 34 वा वाढदिवस

भारतीय क्रिकेट संघात हिटमॅन (Hitman) म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटपटू रोहित शर्माचा आज 34 वा वाढदिवस (Rohit Sharma Birthday) आहे. मूळचा मुंबईचा असलेल्या रोहितने अनेकदा आपली शानदार फलंदाजी दाखविली आहे. त्याने आपल्या नावे अनेक मोठे विक्रम नोंदविले आहेत. एकदिवसीय, कसोटी, टी -20 स्वरूपातही रोहित चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसतो. याशिवाय रोहित शर्माने (Rohit Sharma) आयपीएलमध्येही चांगली कामगिरी बजावली आहे.रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त आपण आज त्याच्या आयुष्याविषयीच्या काही रोचक गोष्टी जाणून घेऊया. (Birthday Special: Hitman's Love Story)

रोहित शर्माने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक चांगल्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीची करामत दाखवली आहे. पण, तुम्हाला माहिती आहे रोहितला खरोखर गोलंदाज होण्याची इच्छा होती. होय, रोहित शर्माला गोलंदाज बनण्याची इच्छा होती. त्याला ऑफस्पिनर बनून फलंदाजांना आपल्या फिरकीची करामत दाखवायची होती . परंतु त्याची फलंदाजीची प्रतिभा कोच दिनेश लाड यांनी आधीच ओळखली होती. त्यांनी  रोहितला फलंदाजीचा सल्ला दिला.  त्यानंतर,  रोहितने तुफानी फलंदाजी करताना चाहत्यांची मने जिंकली.

रोहित-रितिकाची पहिली भेट 
रोहित शर्मा आणि रितिका सजदेह (Ritika Sajdeh) यांची प्रेमकहाणी (Love Story) खूप इंटरेस्टिंग आहे. रितिका पहिली रोहित शर्माची व्यवस्थापक (Maneger) होती. त्याचबरोबर, रितिका भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याची मानलेली बहीण आहे. 2008 साली एका ब्रँडच्या शुटींगच्या निमित्ताने युवराज सिंगमुळे रोहित आणि रितिकाची पहिली भेट झाली. रितिका त्या इव्हेंटची मेनेजर होती. त्यांनतर रोहित आणि रितिका सतत भेटत राहिले. पहिल्यांदा या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यांनतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 

 

कोणी आणि कसा केला प्रपोस? 
सहा वर्ष दोघे सोबत राहिल्यनानंतर रोहितने रितिकाला प्रपोस करण्याचा निर्णय घेतला. रोहितने खूप खास अंदाजात रितिकाला प्रपोस केला होता. रोहितने मुंबईच्या बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये गुडघ्यावर बसून अंगठी घालत रितिकाला प्रपोस केला होता. महत्वाचे म्हणजे हे तेच मैदान आहे जिथे रोहित 11 वर्षाचा असताना पहिल्यांदा क्रिकेट खेळला होता. रितिकाने लगेच होकार दिला. त्यानंतर, रोहितने सोशियल मीडियावरती याची माहिती दिली होती.13 डिसेंबर 2015 रोजी रोहित आणि रितिकाने लग्न केले. त्यांचे लग्न मुंबईतील 'ताज लँड्स' हॉटेलमध्ये झाले होते. रोहित आणि रितिकाच्या लग्नात क्रिकेटर्स सोबत फिल्मी स्टार्स उपस्थित होते. लग्नाच्या दोन दिवस अगोदर मुंबई इंडियन्सचे (MI) मालक अंबानी परिवाराने या दोघांना ग्रँड पार्टी दिली होतो. रोहित शर्माच्या आयुष्यात हा दिवस खूप खास होता. ज्या दिवशी त्याने आपले नवीन जीवन सुरू केले. रोहितने दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त तिसरे द्विशतक झळकावले. रोहितने मोहालीच्या स्टेडियममध्ये हा पराक्रम केला.

रोहित-रितिकाला मुलगी झाली
लग्नाच्या 3 वर्षानंतर रोहितच्या घरी मुलीने जन्म घेतला. त्यावेळी रोहित ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळत होता. त्याला जसेही कळाले मुलीने जन्म घेतला आहे तो लगेच मुंबईला रवाना झाला. हा दिवस पण रोहित शर्मासाठी खूप खास राहिल्याचे त्याने अनेक ठिकाणी सांगितले आहे. दुसरीकडे, तो मेलबर्न टेस्टच्या (26 ते 30 डिसेंबर 2018) ऐतिहासिक विजयाचा एक भाग होता. हा विजय भारतासाठी खूप खास होता. कारण मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत 37 वर्षांनंतर जिंकला होता.

संबंधित बातम्या