''कोहलीला फलंदाजीत करिअर वाढवायचे असल्यास कर्णधारपद रहाणेकडे सोपवावे''

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने दमदार कामगिरी करत मालिका आपल्या खिशात घातली. ऑस्ट्रेलियाच्या  कसोटी मालिकेतील या विजयासाठी भारतीय संघाचे माजी फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी अजिंक्य रहाणेच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने दमदार कामगिरी करत मालिका आपल्या खिशात घातली. ऑस्ट्रेलियाच्या  कसोटी मालिकेतील या विजयासाठी भारतीय संघाचे माजी फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी अजिंक्य रहाणेच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे. याशिवाय फलंदाज म्हणून आपले करिअर अजून वाढवण्यासाठी विराट कोहली कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवू शकतो, असे बिशनसिंग बेदी यांनी म्हटले आहे. तसेच अजिंक्य रहाणेच्या कर्णधारपदाची तुलना टायगर पतौडी यांच्याशी करत, रहाणेच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाज धडाडत असल्याचे बिशनसिंग बेदी यांनी सांगितले आहे. 

भारतीय संघाचे माजी फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी एका वृत्तपत्रात भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल लिहिताना, टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघात कमी ऑप्शन असताना देखील चांगली कामगिरी केल्याचे म्हटले आहे. व त्यामुळे अजिंक्य रहाणेची ही शैली पूर्व क्रिकेटर टायगर पतौडी यांच्याशी मिळत असल्याचे बिशनसिंग बेदी यांनी म्हटले आहे. व यासाठी टायगर पतौडी यांनी क्रिकेटला "भारतीयता" अशी व्याख्या दिली असल्याचे बिशनसिंग बेदी यांनी नमूद केले असून, अजिंक्य रहाणेने देखील ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असेच काहीसे केल्याचे त्यांनी या लेखात म्हटले आहे.  

याव्यतिरिक्त, बिशनसिंग बेदी यांनी पुढे कोणत्याही कर्णधाराची ओळख ही गोलंदाजांच्या वापरण्यावरून होत असल्याचे म्हणत, अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नेमके हेच सिद्ध केले असल्याचे आपल्या लेखात म्हटले आहे. तसेच कर्णधाराचे मूल्यांकन करण्यासाठी फक्त तीन कसोटी सामन्यातील गोलंदाजीतील आणि फिल्डिंग मधील बदल पाहणे महत्वाचे ठरते. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांमध्ये रहाणेची कोणतीच चाल पाहायला मिळाली नाही ज्यावरून आपणाला टीका करता येऊ शकेल, असे बिशनसिंग बेदी यांनी अधोरेखित केले आहे. यानंतर कॅप्टन्सी करणे म्हणजे दहा टक्के स्किल आणि नव्वद टक्के लक असल्याचे बिशनसिंग बेदी यांनी आपल्या लेखात लिहिले आहे. मात्र अजिंक्य रहाणेच्या बाबतीत हे गणित वेगळे असून, त्याच्याकडे पन्नास टक्के स्किल आणि पन्नास टक्के लक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

त्यानंतर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला आपले फलंदाजीतील करिअर वाढवायचे असल्यास त्याने कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्याची सूचना बिशनसिंग बेदी यांनी आपल्या या लेखात केली आहे. क्रिकेटमधील सामायिक जबाबदाऱ्या कॉर्पोरेट किंवा राजकीय क्षेत्रापेक्षा वेगळ्या असल्याचे त्यांनी म्हटले असून, विशेषत: क्रिकेटमध्ये कर्णधाराला संघासोबत एकत्र पोहताना पाहायला मिळू शकते अन्यथा बुडाल्याचे पाहायला मिळते. आणि  त्यामुळे विराट कोहलीच्या फलंदाजीची कारकीर्द मोठी होणार असल्याचे मत बिशनसिंग बेदी यांनी व्यक्त केले आहे. यासोबतच विराट कोहली संघासाठी मोठा फलंदाज म्हणून अधिक कालावधीसाठी पाहिजे का एक साधारण कर्णधार म्हणून पाहिजे, असा प्रश्न देखील बिशनसिंग बेदी यांनी या लेखात विचारला आहे. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना ऍडिलेड येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केले होते. तर हा सामना भारतीय संघाला गमवावा लागला होता. त्यानंतर विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला होता. व पुढील सामन्यांमध्ये भारतीय संघाची धुरा अजिंक्य रहाणेने सांभाळली होती. व त्यानंतर मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने मालिकेत पुनरागमन विजय मिळवला होता. शिवाय सिडनीतील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर शेवटच्या आणि चौथ्या ब्रिस्बेन सामन्यात टीम इंडियाने कांगारूंवर विजय मिळवत मालिका  2 - 1 ने जिंकली होती.                       

संबंधित बातम्या