वास्कोला कळंगुटकडून पराभवाचा झटका

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

कळंगुट असोसिएशनने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी अव्वल स्थानावरील वास्को स्पोर्टस क्लबला पराभवाचा झटका दिला.

पणजी : कळंगुट असोसिएशनने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी अव्वल स्थानावरील वास्को स्पोर्टस क्लबला पराभवाचा झटका दिला. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या लढतीत कळंगुटच्या संघाने पूर्ण तीन गुणांची कमाई करताना 1-0 फरकाने बाजी मारली.

सामन्यातील एकमेव निर्णायक गोल 60व्या मिनिटास कौमे ज्युनियर याने नोंदविला. प्रतिहल्ल्यावर त्यांनी वास्को क्लबचा बचाव भेदला. फुलजान्सो कार्दोझ याने चेंडूवर ताबा राखत सिद्धार्थ कुंडईकर याला पास दिला. त्याने हवेतून चेंडू सिद्धांत शिरोडकरला दिला. यावेळी सिद्धांतने दिलेल्या पासवर कौमे याने अचूक हेडिंग साधताना वास्को क्लबचा गोलरक्षक संजू थापा याला चकविले.

ISL 2021: एफसी गोवाचा जिगरबाज खेळ; मुंबई सिटीशी बरोबरी

पराभवामुळे वास्को क्लबचे 12 गुण कायम राहिले, तसेच त्यांच्या अव्वल क्रमांकात फरक पडलेला नाही. वास्को क्लबचा हा सहा लढतीतील दुसरा पराभव ठरला. तीन गुण मिळाल्यामुळे कळंगुट असोसिएशनची स्थिती सुधारली. त्यांचे आता नऊ गुण झाले आहेत. त्यांचा हा पाच लढतीतील तिसरा विजय आहे.

संबंधित बातम्या