India vs Australia: टीम इंडियाला मोठा धक्का! पहिल्या कसोटीतून प्रमुख फलंदाज बाहेर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीला भारताचा प्रमुख फलंदाज मुकणार आहे.
Team India
Team India Dainik Gomantak

India vs Australia: भारतीय क्रिकेट संघाला 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे, असे रिपोर्ट्स समोर आले आहेत. तो अद्याप त्याच्या पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. मात्र, भारतीय संघाला आशा आहे की तो दुसऱ्या कसोटीपूर्वी पूर्ण तंदुरुस्त होईल.

Team India
Shreyas Iyer: मुंबईचा छोकरा बनला लगानमधील 'भूवन', या मिस्ट्री गर्लबरोबर केला डान्स; Video Viral

श्रेयस अय्यरला गेल्या महिन्यात पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतूनही बाहेर जावे लागले होते. तसेच त्याला बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाण्यास सांगण्यात आले होते. तिथे त्याला आणखी दोन आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला.

त्यामुळे श्रेयस 2 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये सुरु होणाऱ्या भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये सामील होण्याची शक्यता कमी आहे. तसेच तो एनसीएमध्येच पुढील उपाचारासाठी थांबेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूरला सुरु होणार आहे. त्यापूर्वी २ फेब्रुवारीला भारताचा संघ एकत्र येणार आहे.

दरम्यान, आता श्रेयस जर पहिल्या कसोटीत खेळला नाही, तर त्याच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते आणि ही संधी जर त्याला मिळाली, तर त्याचे कसोटीत पदार्पणही होईल.

Team India
Shreyas Iyer किवींना नडतोच! न्यूझीलंडमध्ये भल्याभल्यांना न जमलेला केलाय पराक्रम

याशिवाय रविंद्र जडेजानेही त्याची तंदुरुस्ती रणजी सामन्यादरम्यान सिद्ध केली आहे. त्यामुळे तो देखील 2 फेब्रुवारीला भारताच्या कॅम्पमध्ये सामील होईल. तो गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर होता. पण आता त्याचे नागपूर कसोटीतून भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड समीतीने १६ खेळाडूंची निवड केली आहे. पण आता श्रेयस पहिल्या कसोटीतून बाहेर झाल्याने पहिल्या कसोटीसाठी उर्वरित 15 जणांमधून प्लेइंग इलेव्हन निवडली जाईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com