भारताचे दोन्ही बुद्धिबळ संघ अंतिम फेरीत

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

भारताच्या दोन्ही संघांनी आशियाई नेशन्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुंबई:  भारताच्या दोन्ही संघांनी आशियाई नेशन्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बाद फेरीत कामगिरी उंचावलेल्या पुरुष संघाची अंतिम फेरीत लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल, तर प्राथमिक साखळीपासून बहरात असलेल्या महिला संघासमोर इंडोनेशियाचे 
आव्हान असेल. 

उपांत्य फेरीत भारतीय पुरुष संघाने कझाकस्तानचे आव्हान प्रथम २.५-१.५ आणि त्यानंतर ३-१ असे परतवले, तर भारतीय महिलांनी मंगोलियास ३.५-०.५ आणि ४-० या फरकाने पराजित केले. बी. अधिबन आणि आर. वैशाली यांनी या विजयात मोलाची कामगिरी बजावली.
अधिबनने दोन्ही लढतीत रिनात जुमाबायेव याला अव्वल पटावरील दोन्ही लढतीत पराजित केले. पहिल्या सामन्यात अधिबन विजय मिळवत असताना निहाल सरीन, एसपी सेतुरामन आणि के. शशिकिरणच्या लढती बरोबरीत सुटल्या. दुसऱ्या सामन्यात अधिबन, सरीन आणि सेतुरामनने विजय मिळवला; पण शशिकिरणला हार पत्करावी लागली. भारतीय कर्णधार सूर्यशेखर गांगुलीने या लढतीच्या वेळी विश्रांती घेतली होती.

या स्पर्धेत अव्वल पटावरील सुवर्णपदक जिंकलेल्या वैशालीने दोन्ही डावात सहज विजय मिळवला. तिला पहिल्या लढतीच्या वेळी पद्मिनी रौत आणि नधिधा यांच्या विजयाची साथ लाभली. कर्णधार मेरी ॲन गोम्सची लढत बरोबरीत सुटली. दुसऱ्या लढतीच्या वेळी मेरीऐवजी भक्ती कुलकर्णी खेळली आणि भारताने चारही डाव जिंकले.  भारताच्या दोन्ही संघांनी आशियाई नेशन्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बाद फेरीत कामगिरी उंचावलेल्या पुरुष संघाची अंतिम फेरीत लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल, तर प्राथमिक साखळीपासून बहरात असलेल्या महिला संघासमोर इंडोनेशियाचे 
आव्हान असेल. 

उपांत्य फेरीत भारतीय पुरुष संघाने कझाकस्तानचे आव्हान प्रथम २.५-१.५ आणि त्यानंतर ३-१ असे परतवले, तर भारतीय महिलांनी मंगोलियास ३.५-०.५ आणि ४-० या फरकाने पराजित केले. बी. अधिबन आणि आर. वैशाली यांनी या विजयात मोलाची कामगिरी बजावली.
अधिबनने दोन्ही लढतीत रिनात जुमाबायेव याला अव्वल पटावरील दोन्ही लढतीत पराजित केले. पहिल्या सामन्यात अधिबन विजय मिळवत असताना निहाल सरीन, एसपी सेतुरामन आणि के. शशिकिरणच्या लढती बरोबरीत सुटल्या. दुसऱ्या सामन्यात अधिबन, सरीन आणि सेतुरामनने विजय मिळवला; पण शशिकिरणला हार पत्करावी लागली. भारतीय कर्णधार सूर्यशेखर गांगुलीने या लढतीच्या वेळी विश्रांती घेतली होती.

या स्पर्धेत अव्वल पटावरील सुवर्णपदक जिंकलेल्या वैशालीने दोन्ही डावात सहज विजय मिळवला. तिला पहिल्या लढतीच्या वेळी पद्मिनी रौत आणि नधिधा यांच्या विजयाची साथ लाभली. कर्णधार मेरी ॲन गोम्सची लढत बरोबरीत सुटली. दुसऱ्या लढतीच्या वेळी मेरीऐवजी भक्ती कुलकर्णी खेळली आणि भारताने चारही डाव जिंकले.

संबंधित बातम्या