बुमूस अजूनही एफसी गोवाचाच
Hugo Boumous

बुमूस अजूनही एफसी गोवाचाच

पणजी

गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला अदनान ह्यूगो बुमूस याने आपण एफसी गोवा संघाशी फारकत घेत असल्याचे जाहीर करताचलगेच आयएसएल लीग विनर्स शिल्ड विजेत्या संघाने खेळाडूस अजून मुक्त न केल्याचे स्पष्ट केले.

आक्रमक-मध्यरक्षक असलेल्या २५ वर्षीय बुमूसने सोमवारी इन्टाग्रामद्वारे आपण एफसी गोवापासून दूर होत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर लगेच एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने ट्विटरद्वारे निवेदन जारी करून बुमूस हा एफसी गोवाचा करारबद्ध खेळाडू असून त्याच्यासंदर्भात अन्य क्लबसोबत कोणतेच मतैक्य झाले नसल्याचे स्पष्ट केले.

मोरोक्कोचे प्रतिनिधित्व केलेला फ्रेंच खेळाडू ह्यूगो बुमूस याच्याशी एफसी गोवाने ३ फेब्रुवारी २०१८ रोजी पहिल्यांदा करार केला होतात्यानंतर यावर्षी २४ एप्रिल रोजी हा करार आणखी तीन वर्षांसाठी वाढविण्यात आला होता. त्यानुसारबुमूस ३१ मे २०२३ पर्यंत एफसी गोवाशी करारबद्ध आहे. मात्र सोमवारी बुमूस याने आपण एफसी गोवा संघापासून दूर होत असल्याचे जाहीर करून साऱ्यांनाच धक्का दिला.

एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली बुमूसने मागील तीन मोसमातील आयएसएल स्पर्धेत छाप पाडली होती. गतमोसमातील १५ सामन्यांत ११ गोल आणि १० असिस्ट अशी बहारदार कामगिरी नोंदवत या २५ वर्षीय खेळाडूने आयएसएलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे बक्षीस प्राप्त केले होते. मागील तीन आयएसएल मोसमात या आक्रमक-मध्यरक्षकाने १६ गोल केले. एफसी गोवाचा यशस्वी आघाडीपटू फेरान कोरोमिनास याच्यासोबत त्याची सुरेख जोडी जमली होती. आगामी मोसमासाठी एफसी गोवा संघाने स्पेनचेच ह्वआन फॅरेन्डो या प्रशिक्षकांची नियुक्ती केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ आयएसएल आणि एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळेल.

एफसी गोवाचा निरोप घेणाऱ्या आपल्या सोशल मीडियावरील निवेदनात बुमूसने संघातील खेळाडूकर्मचारी आणि चाहत्यांचे स्मृतींबद्दल आभार मानले आहेत. `प्रिय गोवाएफसी गोवासोबतचा माझा प्रवास संपल्याचे मी जाहीर करतो. हा निर्णय घेणे कठीण ठरले. देशभरात गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करू शकलो याबद्दल कृतज्ञ आहे. दोन वर्षांत मिळालेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे`, अशा आशयाचे मनोगत बुमूसने व्यक्त केले.

 एफसी गोवातर्फे आयएसएल स्पर्धेत ह्यूगो बुमूस

मोसम सामने गोल असिस्ट

२०१७-१८ ८ २ २

२०१८-१९ १९ ३ ५

२०१९-२० १५ ११ १०

एकूण ४२ १६ १७

संपादन - अवित बगळे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com