IND vs SL Final: 'रेकॉर्ड'धारी रोहित शर्मा, तेंडूलकरला मागे टाकत एमएस धोनीच्या विक्रमाशी केली बरोबरी

IND vs SL Final: भारतीय संघाने आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला.
Rohit Sharma
Rohit SharmaDainikGomantak

IND vs SL Final: भारतीय संघाने आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला. मोहम्मद सिराजने तूफानी गोलंदाजी करत श्रीलंकेला या सामन्यात टिकू दिले नाही.

सिराज या सामन्याचा 'हिरो' ठरला. सिराजच्या या शानदार गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा संघ अवघ्या 50 धावांत ऑलआउट झाला. दुसरीकडे, टीम इंडियाने अवघ्या 37 चेंडूत लक्ष्य गाठले.

दरम्यान, कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा आशिया कप जिंकला. या विजयासह रोहितने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या विशेष रेकॉर्डबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Rohit Sharma
IND vs SL Final: श्रीलंकेने जिंकला 'टॉस', विराट-बुमराहसह 'या' 5 खेळाडूंचे टीम इंडियात पुनरागमन; पाहा प्लेइंग-11

रोहित शर्माने कर्णधार म्हणून एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली

वास्तविक, भारतीय संघाने आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. तर रोहित शर्माने कर्णधार म्हणून दोन वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे. या बाबतीत, त्याने एमएस धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी बरोबरी केली आहे, ज्यांनी आशिया कप ट्रॉफी दोनदा जिंकली आहे.

एकदिवसीय आशिया कप स्पर्धेतील सर्वाधिक विजयांचे विक्रम करणारे

रोहित शर्मा- 9 (11 सामन्यांत)

एमएस धोनी - 9 (14 सामने)

अर्जुन रणतुंगा - 9 (13 सामने)

Rohit Sharma
IND vs SL Final: 'खूप प्रश्न विचारले जातील...', फायनलमधील दारुण पराभवानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षकाचं मोठं वक्तव्य

सर्वाधिक मेन्स ODI सामने 10 विकेट्सने जिंकणारे भारतीय कर्णधार:

3 - रोहित शर्मा

1 - एमएस धोनी

1 - एस वेंकटराघवन

1 - सुनील गावस्कर

1 - सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)

1 - मोहम्मद अझरुद्दीन

1 - सौरव गांगुली

1 - KL राहुल

Rohit Sharma
IND vs SL: मोहम्मद सिराजने केला मोठा खुलासा, श्रीलंकेविरुद्ध 'या' खास प्लॅनने...

5 वेळा आशिया कप फायनल खेळणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू

2008

2010

2016

2018

2023*

Rohit Sharma
IND vs SL: दुनिथ वेलालागेने रचला इतिहास, टीम इंडियाच्या दिग्गजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता!

भारतासाठी सर्वाधिक आशिया कप फायनल खेळणारे खेळाडू

5 - रोहित शर्मा*

4 - रवींद्र जडेजा*

4 - एम अझरुद्दीन

4 - एमएस धोनी

4 - नवज्योत सिद्धू

4 - सचिन तेंडुलकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com