बोर्नमाऊथच्या फुलबॉलपटू प्रतिस्पर्ध्याला रागात चावला

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 डिसेंबर 2020

 जेफरसन लेर्मा याने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूचा फुटबॉल सामन्याच्या वेळी चावा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. लेर्माचा संघ बोर्नमाऊथ शेफिल्ड वेन्सडेविरुद्धच्या स्काय बेट स्पर्धेत ०-१ असा पराजित झाला होता

लंडन- खेळात एकमेकांविरोधात तुटून पडण्याचे अनेक प्रकार घडतात. मात्र, लंडनमधील हा प्रकार बघून अनेकांना हसू येण्याचीच जास्त शक्यता आहे. 
 जेफरसन लेर्मा याने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूचा फुटबॉल सामन्याच्या वेळी चावा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. लेर्माचा संघ बोर्नमाऊथ शेफिल्ड वेन्सडेविरुद्धच्या स्काय बेट स्पर्धेत ०-१ असा पराजित झाला होता. ही लढत नोव्हेंबरमध्ये झाली होती. 

या लढतीतील ८३व्या मिनिटास लेर्मा प्रतिस्पर्ध्यास चावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. लेर्माने हा आरोप फेटाळला आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याची दीर्घकालीन बडतर्फी होऊ शकेल. विश्वकरंडक स्पर्धेत ब्रॅनिस्लाव इवानोविक याला चावल्याबद्दल लुईस सुआरेझवर दहा सामन्याची बंदी घालण्यात आली होती. 

संबंधित बातम्या