बॉक्‍सर विकास विकास कृष्णन अमेरिकेला जाणार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

विकास कृष्णन ३० नोव्हेंबरपर्यंत व्हर्जिनियामधील अलेक्‍झांड्रिया बॉक्‍सिंग क्‍लबमध्ये अमेरिकेचे प्रशिक्षक रॉन सिमन्स ज्युनियर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे.

नवी दिल्ली: भारताचा आघाडीचा बॉक्‍सर विकास कृष्णन आगामी टोकियो ऑलिम्पिक बॉक्‍सिंग स्पर्धेच्या तयारीसाठी अमेरिकेला पुढील आठवड्यात रवाना होणार आहे. त्याला भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून सरावासाठी परवानगीसह आर्थिक मदत म्हणून १७.५ लाख रुपयेही देण्यात आलेले आहेत. 

विकास कृष्णन ३० नोव्हेंबरपर्यंत व्हर्जिनियामधील अलेक्‍झांड्रिया बॉक्‍सिंग क्‍लबमध्ये अमेरिकेचे प्रशिक्षक रॉन सिमन्स ज्युनियर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे. दरम्यान, विकासने आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. 

याआधी टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवलेल्या विकास कृष्णनने ऑलिम्पिकच्या तयारीसाठी अमेरिकेत सराव करण्याची परवानगी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे मागितली होती,’ असे साईने निवेदनात म्हटले आहे. याव्यतिरिक्त विकासने अमेरिकेत सराव करण्यासाठीची शिफारस भारतीय बॉक्‍सिंगचे उच्च परफॉर्मन्स डायरेक्‍टर सॅंटियागो निवा यांनी केली होती. 

‘विकासासाठी हा खूप चांगला अनुभव असेल. तो बरीच वर्षे राष्ट्रीय संघात आहे, तो परतल्यानंतर आम्ही टोकियो ऑलिम्पिकपूर्वी ऑलिम्पिक-शैलीतील बॉक्‍सिंगसाठी शिबिरे आणि वेगवेगळ्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित करू’, असे निवा म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या