गोवा क्रीडा प्राधिकरणाचे बॉक्सिंग प्रशिक्षक ओलाफ यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

ओलाफ यांनी पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात, कांपाल येथील क्रीडा संकुलात युवा बॉक्सरना मार्गदर्शन केले होते. 

पणजी: गोवा क्रीडा प्राधिकरणाचे बॉक्सिंग प्रशिक्षक ओलाफ ऑलिव्हेरा यांचे वयाच्या ४८व्या वर्षी नुकतेच निधन झाले. प्रशिक्षक बनण्यापूर्वी त्यांनी खेळाडू या नात्याने छाप पाडली होती. राज्यस्तरीय पातळीवर चमकल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर ज्युनियर आणि सीनियर गटात गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते.

खेळाडू या नात्याने निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. ओलाफ यांनी पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात, कांपाल येथील क्रीडा संकुलात युवा बॉक्सरना मार्गदर्शन केले. हल्लीच त्यांनी बांबोळी येथील जीएमसी ॲथलेटिक स्टेडियम संकुलात नियुक्ती करण्यात आली होती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या