Pele Hospitalized: ब्राझीलीयन स्टार पेले रुग्णालयात दाखल, कॅन्सरशी झुंज सुरु

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Pele
Pele Dainik Gomantak

Pele hospitalized: ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. पेले हे कर्करोगाशी सध्या झुंज देत आहेत.

रिपोर्ट्सनुसार पेले यांना साओ पावलोमधील अल्बर्ट आईस्टाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या मुलीने माहिती दिली आहे की रुग्णायलात दाखल करण्यामागे काही निकडीचा प्रसंग उद्भवला नव्हता.

Pele
FIFA World Cup 2022: खेळाडू देतायेत विविध संदेश, पण शांततेत!

पेले यांनी गेल्याच महिन्यात त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केला आहे. पण गेल्या वर्षभरापासून त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यांना वर्षभरात अनेकदा रुग्णालयात नेण्यात आले आहे. गेल्याचवर्षी त्यांच्या ग्रहणीतून ट्रयूमर काढण्यात आला होता. त्यांना कर्करोगाचेही निदान झाले आहे.

इतकेच नाही तर काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की त्यांचा मानसिक गोंधळ होत आहे. तसेच याआधी त्यांना काही लिव्हरचा त्रास आहे का, यासाठीही चाचण्या झाल्या होत्या.

Pele
FIFA World Cup 2022: 'रेनबो फ्लॅग' घेऊन प्रेक्षकाची लाईव्ह सामन्यादरम्यान थेट मैदानात धाव; Video

दरम्यान, पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो यांनी इंस्टाग्रामवरून माहिती दिली आहे की 'त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझे काही भावंड ब्राझीलला गेले होते. कोणतीही निकडीचा प्रसंग उद्भवलेला नाही. मी नवीन वर्षासाठी तिथे असेल आणि काही फोटोही पोस्ट करेल. पण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल कृतज्ञता.'

पेले हे महान फुटबॉलपटूंपैकी एक असून त्यांनी तीन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com