माजी भारतीय क्रिकेटपटू 'सौरव गांगुलींना' ह्रदयविकाराचा झटका

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जानेवारी 2021

जीममध्ये व्यायाम करत असताना सौरव गांगुलीना ह्रदयविकाराचा झटका आला.

कोलकाता :  जीममध्ये व्यायाम करत असताना सौरव गांगुलीना ह्रदयविकाराचा झटका आला. व्यायाम करताना चक्कर व छातीत दुखू लागल्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बाब उघडकिस आली. सध्या त्यांच्यावर वुडलँड्स रुग्णालयातील ३ डॉक्टर्सच्या टीमकडून उपचार सुरू आहेत.

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वृत्तानंतर क्रिकेट प्रेमींसह अनेकांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुली यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी धक्का देणारी आहे. ते आजारातून लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या