कमिन्सच्या आवाहनानंतर ब्रेट लीने केली भारताला मोठी मदत

कमिन्सच्या आवाहनानंतर ब्रेट लीने केली भारताला मोठी मदत
Brett Lee helped India a lot after Cummins appeal

देशात कोरोना प्रादूर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. भारतातील कोरोनाची स्थिती अत्यंत भयंकर होत चालली आहे. ऑस्ट्रेलियाचा (Australia) क्रिकटेपटू पॅट कमिन्सने (Pat Cummins) कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी 37 लाखांची मदत केली आहे. पॅट कमिन्स नंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने (Brett Lee) भारताच्या कठीण काळात मदतीचा हात पुढे केला आहे. ब्रेट लीने ऑक्सिजनच्या (Oxygen) पुरवठ्यसाठी 42 लाख रुपयांची मदत केली आहे. पॅट कमिन्सने भारताच्या कठीण काळात मदत करण्याची विनंती आपल्या सहकाऱ्यांना केली होती. कमिन्सच्या आवाहनानंतर ब्रेट लीने भारताला मदत केली आहे. (Brett Lee helped India a lot after Cummins appeal)

ब्रेट लीने आपल्या सोशल मिडियावरील ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहले की, ‘’भारत हा माझ्यासाठी नेहमीच दुसऱ्या घरासारखा आहे. माझी व्यवसाठिक कारकिर्द आणि निवृत्तीनंतर चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमामुळे भारताचे माझ्या ह्रदयात एक विशेष स्थान आहे. लोक या कोरोना काळात ज्या प्रकारे संघर्ष करत आहेत ते पाहून मला खूप वाईट वाटत आहे. परंतु मी ज्या स्थानी आहे त्याचा मला फार आनंद आहे. कारण मी लोकांसाठी काहीतरी करु शकतो. मला काही मदत द्यायची आहे, ज्यामुळे देशातील रुग्णालयांना ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी मदत होईल. ही सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आहे. आपण आपल्याला जमेल तसे गरजू लोकांना मदत करु शकतो. या कोरोनाच्या कठीण काळात काम करणाऱ्या सर्व कोरोना योध्द्यांचे मी धन्यवाद मानतो.’’ 

 तसेच,‘’मी सर्व लोकांना विनंती करतो, की त्यांनी आपली स्वत:ची काळजी घ्यावी. घरात रहावे, हात चांगले धुवावेत आणि जेव्हा महत्त्वाचे असेल तेव्हाच बाहेर पडावे. मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. कमिन्स तु चांगली कामगिरी केली आहे,’’ असेही ब्रेट लीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com