विरूष्काचं बाळ ऑस्ट्रेलियात जन्माला यावं: या खेळाडूने व्यक्त केली इच्छा

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने विराट कोहली आणि अभिनेत्री  अनुष्का शर्मा यांचे आपत्य ऑस्ट्रेलियात जन्मास यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने विराट कोहली आणि अभिनेत्री  अनुष्का शर्मा यांचे आपत्य ऑस्ट्रेलियात जन्मास यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की ऑस्ट्रेलियाचे लोकं त्याचा आनंदाने स्विकार करतील.

आता विरूष्काच्या बाळाचा जन्म थेट ऑस्ट्रेलियातच होण्यासंबंधीचा प्रस्ताव या सेलिब्रिटी जोडीपुढे ठेवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील माजी खेळाडू ब्रेट लीनं ही इच्छा 'विरुष्का'पुढे व्यक्त केली आहे.

'मिड- डे' या वृत्तपत्राला  दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं यासंबंधीचं वक्तव्य केल्याचं म्हटलं जात आहे. विराट आणि अनुष्काची इच्छा असेल तर, त्यांच्या बाळाचं ऑस्ट्रेलियात स्वागतच आहे. ऑस्ट्रेलियातील नागरिक त्याचा आनंदानं स्वीकार करतील, असंही त्याने म्हटलं आहे.

'तुम्हाला मुलगा झाला तरीही आनंदच आहे आणि मुलगी झाली तरीही उत्तमच होणार आहे', असं म्हणत ब्रेट लीनं आगळ्यावेगळ्या अंदाजात 'विरुष्का'पुढं ही इच्छा ठेवली. ऑस्ट्रेलियाच्या या लोकप्रिय खेळाडूच्या इच्छेवर विराट आणि अनुष्का काय उत्तर देतात याकडे चाहत्यांच सध्या लक्ष लागलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 21 डिसेंबरला संपणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यानंतर तो पुन्हा मायदेशी परत जाणार आहे

 

 

 

संबंधित बातम्या