कोहलीच्या अनुपस्थितीचा ऑस्ट्रेलियन चॅनल्सना फटका

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चारपैकी तीन कसोटीत कोहली नसल्यामुळे आर्थिक फटका बसेल अशी भीती प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या दूरचित्रवाणी वाहिनीस वाटत आहे. भारत - ऑस्ट्रेलिया मालिकेतील मर्यादित षटकांच्या लढतीच्या प्रक्षेपणाचे हक्क फॉक्‍स स्पोर्टस्‌कडे, तर कसोटी प्रक्षेपणाचे हक्क चॅनेल सेवनकडे आहेत.

मेलबर्न :  भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चारपैकी तीन कसोटीत कोहली नसल्यामुळे आर्थिक फटका बसेल अशी भीती प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या दूरचित्रवाणी वाहिनीस वाटत आहे. भारत - ऑस्ट्रेलिया मालिकेतील मर्यादित षटकांच्या लढतीच्या प्रक्षेपणाचे हक्क फॉक्‍स स्पोर्टस्‌कडे, तर कसोटी प्रक्षेपणाचे हक्क चॅनेल सेवनकडे आहेत. फॉक्‍स स्पोर्टस्‌ला कोहलीचा सहभाग असलेल्या सामन्याच्या प्रक्षेपणाचे सहा दिवस मिळतील, तर चॅनेल सेवनला अवघे पाच. दोन्ही वाहिन्यांनी मालिकेचे मार्केटिंग विराटभोवती केले आहे.फॉक्‍स स्पोर्टस्‌ जाहिरातीचे दर वाढवत आहे, तर चॅनेल सेवनला जाहिरातीचे दर कमी करणे भाग पडत असल्याचे समजते. 

कोहलीच्या अनुपस्थितीवरून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि चॅनेल सेवन यांच्यात संघर्ष सुरू होण्याची शक्‍यता आहे. भारताने ख्रिसमसच्या सुटीच्या कालावधीत एकच कसोटी घेण्यास भाग पाडल्याने चॅनेल सेवन यापूर्वीच संतापले होते. विराटची संभाव्य अनुपस्थिती आपल्यापासून दडवून ठेवली, असा ते आरोप करीत आहेत. आता प्रक्षेपणाचे शुल्क कमी करण्याची मागणी चॅनेल सेवन करीत आहे.

संबंधित बातम्या