कळंगुट असोसिएशनचा वेळसाव क्लबवर सोपा विजय

कळंगुट असोसिएशनचा वेळसाव क्लबवर सोपा विजय
Calangute Association wins over Velsav Club

पणजी: कळंगुट असोसिएशनने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबवर 2-0 फरकाने सोपा विजय प्राप्त केला. सामना शुक्रवारी धुळेर-म्हापसा येथील स्टेडियमवर झाला.

कळंगुट असोसिएशनला मोहिमेतील पहिल्या लढतीत पूर्ण तीन गुण मिळवून देताना कौआमे ज्युनियर व सिद्धार्थ कुंडईकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल झाला.

गोलशून्य बरोबरीची कोंडी 26व्या मिनिटास शानदार हेडिंगद्वारे कौआमे याने फोडली. त्याने फुलजान्सो कार्दोझ याच्या असिस्टवर हा गोल केला. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना कौआमे याच्या असिस्टवर सिद्धार्थने कळंगुटच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला. स्पर्धेत शनिवारी (ता. 30) चर्चिल ब्रदर्स व वास्को स्पोर्टस क्लब यांच्यात धुळेर स्टेडियमवर सामना होईल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com