रोहितकडून संघातील खेळाडूंचे कौतुक

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

आयपीएलच्या पहिल्या क्वलिफायर-१ सामन्यात दिल्ली कॅपिटलला चारीमुंड्या चीत करून अंतिम फेरी गाठणाऱ्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा भलताच खूष झाला आहे, एकदमच परिपूर्ण अशा शब्दांत त्याने आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

दुबई :  आयपीएलच्या पहिल्या क्वलिफायर-१ सामन्यात दिल्ली कॅपिटलला चारीमुंड्या चीत करून अंतिम फेरी गाठणाऱ्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा भलताच खूष झाला आहे, एकदमच परिपूर्ण अशा शब्दांत त्याने आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

स्वतः रोहित शर्मा आणि किएरॉन पोलार्ड शून्यावर बाद होऊनही मुंबई इंडियन्सने गुरुवारी झालेल्या सामन्यात दोनशे धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादवने अर्धशतक केले. त्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी झंझावाती फलंदाजी केली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनीही प्रभावी कागगिरी करत दिल्लीला १४३ धावांवर रोखले. बुमारने ४/१४ तर बोल्टने २/९ अशी कामगिरी केली. विजयाचे श्रेय सर्वच खेळाडूंना आहे. त्यांनी सामन्याला पूर्णपणे आमच्या बाजूने झुकवले. भलीमोठी धावसंख्या उभारणे आणि त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांचे सुरुवातीचे फलंदाज लगेचच बाद करणे आणि ठराविक अंतराने विकेट मिळवणे सर्व काही स्वप्नवत होते, असे कौतुक रोहितने केले. रोहित पुढे म्हणतो, संपूर्ण स्पर्धेत आमची गोलंदाजी चांगलीच प्रभावी ठरलेली आहे.

सूर्यकुमारचे कौतुक
रोहित शर्माने सूर्यकुमार यादवचे विशेष कौतुक केले. जेव्हा जेव्हा आम्ही सुरुवातीला विकेट गमावल्या आहेत तेव्हा तेव्हा त्याने जबाबदारी घेत डाव सावरलेला आहे. यंदा तो चांगल्याच फॉर्मात आहे. आमच्यासाठी तो मौल्यवान फलंदाज आहे. मी दुसऱ्या षटकात बाद झाल्यावर डिकॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी महत्त्वाची भागीदारी करून लय मिळवून दिली.

संबंधित बातम्या