संवाद खुंटणार नाही याची प्रशिक्षकांकडून दक्षता

dainik gomantak
रविवार, 24 मे 2020

वास्को येथील केंद्राचे ग्रासरूट प्रशिक्षक असलेले गॉडविन रॉड्रिग्ज फोर्सा गोवा फौंडेशनमधील युवा खेळाडूंशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क राहिले. युवा खेळाडूंना कार्यरत राखण्यासाठी उपाययोजना केल्या.

पणजी,

 कोविड-१९ लॉकडाऊनमुळे खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील दुरावा वाढणार नाही याकडे लक्ष देतानाफोर्सा गोवा फौंडेशनच्या ग्रासरूट प्रशिक्षकांनी खेळाडूसोबतचा संवाद खुंटणार नाही याची दक्षता घेतली.

फोर्सा गोवा फौंडेशनचे सीनियर ग्रासरूट प्रशिक्षक रूपेश माडकरग्रासरूट प्रशिक्षक गॉडविन रॉड्रिग्जव्यवस्थापक केनेथ फर्नांडिस यांनी लॉकडाऊनमध्ये विविध माध्यमाद्वारे खेळाडूंना मार्गदर्शन करण्यावर भर दिलातसेच स्वतःही व्यस्त राहिले.

रूपेश फोर्सा गोवा फौंडेशनच्या उत्तर विभागीय सेंटर फॉर एक्सलन्सचे सीनियर ग्रासरूट प्रशिक्षक आहेत. सी-लायसन्सधारक असलेल्या रूपेश यांनी सांगितलेकी ‘‘मी खेळाडूंना घरीच करण्याजोगे व्यायाम सुचविलेतसेच भावंडासमवेत खेळ खेळण्यास सांगितले. त्यामुळे त्यांना सक्रिय राहणे शक्य झाले. लॉकडाऊनमध्ये मी स्वतःला तंदुरुस्त राखण्यासाठी योगस्ट्रेचिंगध्यान-चिंतन यावर भर होता. लांब मार्गावरील सायकलिंगही केले.’’ फावल्या वेळेचा सदुपयोग करताना रूपेश यांनी भावाला शेतकामातही मदत केली. 

वास्को येथील केंद्राचे ग्रासरूट प्रशिक्षक असलेले गॉडविन रॉड्रिग्ज फोर्सा गोवा फौंडेशनमधील युवा खेळाडूंशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क राहिले. युवा खेळाडूंना कार्यरत राखण्यासाठी उपाययोजना केल्या. फुटबॉल व्हिडिओंचे चित्रण केले. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी फुटबॉलविषयक भरपूर वाचन केलेतसेच प्रशिक्षण आणि व्यवस्थापनातील नव्या संकल्पनेची माहिती मिळविली. ते समुद्र किनाऱ्याजवळ राहत असल्यामुळे स्वतःला तंदुरुस्त राखण्यासाठी समुद्रात आठवड्यात किमान तीन वेळा पोहण्यावरतसेच समुद्रकिनारी धावण्यावर भर दिला.

फोर्सा गोवा फौंडेशनचे दक्षिण गोवा ग्रासरूट व्यवस्थापक असलेले केनेथ स्पोर्टस बिझनेस मॅनेजमेंटमधील ब्रिटनमधील शेफिल्ड हॅलॅम विद्यापीठाचे पदवीधारक आहेत. तेथील विद्यापीठ अकादमीचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. लॉकडाऊन कालावधीत फोर्सा गोवा फौंडेशनच्या मुलांना व्यस्त राखण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून फुटबॉल प्रात्यक्षिके आणि तंदुरुस्ती व्यायाम यांना प्राधान्य दिल्याचे केनेथ यांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये स्वतःच्या मुलाशी खेळण्यात जास्त वेळ गेल्यामुळे वैयक्तिक तंदुरुस्तीचा प्रश्न उद्भवला नाहीअसे त्यांनी प्रामाणिकपणे नमूद केले. त्यांनी ऑनलाईन फुटबॉल वेबिनारमध्येही भाग घेतला.

संबंधित बातम्या