राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू बनला गोव्यात 'चेन स्नॅचर'

जूने गोवा मध्ये सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी मोनू सिंग (20) आणि गौतम धापसे (19) या दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे.
राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू बनला गोव्यात 'चेन स्नॅचर'
Chain snatcher becomes national football player in Goa Dainik Gomantak

गोवा: जुने गोवा मध्ये सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी मोनू सिंग (20) आणि गौतम धापसे (19) या दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही दुचाकीवरून येत होते दरम्यान त्यांनी पीडितांची चेन हिसकावली आणि पळून गेले.

(Chain snatcher becomes national football player in Goa)

Chain snatcher becomes national football player in Goa
‘डेल्टिन काराव्हेला’चे व्यवहार अखेर सुरू

धक्कादायक बाब म्हणजे, या दोघांमधील एक तरूण राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळाडू आहे. करोनाच्या काळात बेकार झाल्याने राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल सामने खेळलेल्या एका तरुणाने चोरीचा मार्ग अवलंबल्याचे समोर आले आहे.

दोघेही आरोपी मूळचे नाशिकचे असून, या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांची कसून चौकशी सुरू आहे. राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. याच पार्श्र्वभूमीवर मागील आठवड्यात ओल्ड गोवा परिसरात सोन्याची साखळी हिसकावून घेण्याचे दोन प्रकार घडले आहेत. राज्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, चोरी करण्यासाठी चोरटे बाइकचा वापर करतात.

या प्रकरणाबाबत चौकशी करताना पोलिसांना महत्त्वाचं सुगावा हाती लागला; शोध घेत असताना जूने गोवा येथे राहणारे संबंधित संशयित हे नाशिक येथे पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान गोवा पोलिस पथक नाशिकला रवाना झाले. पोलिसांनी संशयितांना अटक केली. त्यांची कसून चैकशी केली असता, संशयितांकडे चोरीचा माल मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.