यूईएफा चॅम्पियन्स लीगमध्ये चेल्सीची विजेतेपदावर मोहोर 

दैनिक गोमंतक
रविवार, 30 मे 2021

चेल्सीने (Chelsea)  मँचेस्टर सिटीचा (Manchester City) 1-0  असा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे. पहिल्या हाफच्या 42 व्या मिनिटाला चेल्सीकडून काई हव्हर्टने (Kai Havertz) गोल केला.

यूईएफ चॅम्पियन्स लीगच्या (Uefa Champions League) अंतिम सामन्यात चेल्सीने (Chelsea)  मँचेस्टर सिटीचा (Manchester City) 1-0  असा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे. पहिल्या हाफच्या 42 व्या मिनिटाला चेल्सीकडून काई हव्हर्टने (Kai Havertz) गोल केला. हव्हर्टनचा ह्याच गोलने चेल्सीला जेतेपदाचा शिक्का मोर्तब केला.  सामना संपेपर्यंत मॅनचेस्टर सिटी गोल करण्यात अपयशी ठरला. तब्बल  9 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चेल्सीने चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळविण्यात यश आले आहे. Chelsea win the UEFA Champions League 

या सामन्यात खरेतर मॅनचेस्टर सिटी  विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. मॅनचेस्टर सिटीने प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पण विजेतेपद जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. चेल्सीने यूईएफए चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. 

उपांत्य सामन्यात चेल्सीने 13 वेळेला चॅम्पियन झालेल्या रियल माद्रिदचा पराभव करत  अंतिम फेरीत धडक मारली. तर स्पर्धेतील मँचेस्टर सिटीची कामगिरी देखील प्रभावी होती. त्यांनी उपांत्य फेरीच्यात गेल्या वर्षीच्या उपविजेत्या ठरलेल्या पॅरिस सेंटला २-० ने हरवून  अंतिम फेरीत आपले स्थान मिळविले होते. 

चेल्सीने 2012 मध्ये प्रथम चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळविले. त्यानंतर 2018 मध्ये अंतिम फेरी गाठली, परंतु नंतर संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच वेळी, मॅनचेस्टर सिटीचे त्यांच्या पहिल्या चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले.

संबंधित बातम्या